धारूर महाविद्यालयातील 12 विद्यार्थ्यांची आर्मी मध्ये निवड

Beed

धारूर महाविद्यालयातील 12 विद्यार्थ्यांची आर्मी मध्ये निवड
     
किल्लेधारुर/प्रतिनिधी   

धारूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील कॅडेट व इतर शाखांमधील विद्यार्थी असे एकूण बारा विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलामध्ये नुकतीच निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांचा स्वागत व सत्कार समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांच्या हस्ते व उपप्राचार्य महादेव जोगडे, मेजर डॉ. मिलिंद गायकवाड व पर्यवेक्षक सिद्धेश्वर काळे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
          प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढे ते म्हणाले की निवड झालेले विद्यार्थी भारत मातेच्या सेवेसाठी निस्वार्थपणे सेवा करावी. भारतीय सैन्य दल खरोखरच अतुलनीय कामगिरी करत आहे त्यामध्ये आपली निवड झाल्यामुळे खरोखरच आपण भाग्यवान आहात. ट्रेनिंग च्या ठिकाणी आपण महाविद्यालयाचे नाव लौकिक करावे असे आवाहन प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी ट्रेनिंगसाठी व पुढील सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
         कार्यक्रमासाठी उपप्राचार्य महादेव जोगडे, प्रा. डॉ. संजय जाधव, पर्यवेक्षक सिद्धेश्वर काळे तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मेजर डॉ. मिलिंद गायकवाड यांनी केले.

Sharing

Visitor Counter