पदवीधरांना जो सुशिक्षित भत्ता मिळवून देईल त्यालाच निवडून द्यावे -लोकसेना

Beed

पदवीधरांना जो सुशिक्षित भत्ता मिळवून देईल त्यालाच  निवडून द्यावे -लोकसेना 

बीड/वार्ताहर 

राज्यात अनेक विभागातील शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका लागलेल्या आहेत जो उमेदवार पदवीधरांना सुशिक्षित बेरोजगार भत्ता शासनाकडून मिळवून देईल व विना अनुदानीत शिक्षकांच्या समस्या सोडवतील अशा उमेदवारांना मतदार बंधून्नी निवडून द्यावे असे आवाहन लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी केले आहे. 
     मागच्या अनेक वर्षापासून शिक्षक व पदवीधर मतदार संघावर प्रस्थापित व उद्योगपतिंचा वर्चस्व आहे पैश्याच्या बळावर व वशिलेबाजीने निवडणूक टिकेटे घ्याची निवडणूकीत अडमाप पैसा खर्च करायचा व निवडून आल्यावर पुढच्या निवडणूकी पर्यंत गायब होण्याचे धंदे यांनी लावले मग ते विना अनुदानावर काम करणारा शिक्षक मरतो का,  नौकरी न मिळणारा  बेरोज़गार पदवीधर आत्महत्या करताे का यांना काहीही देने घेणे नाही मग अशा उमेदवारांना यांची जागा  दाखवायची असेल तर चांगल्या होतकरू मेहनती सर्वगुण संपन्न असणा-या उमेदवाराला निवडून देने गरजेचे आहे. पदवीधर निवडणूकीत निवडून आलेल्या उमेदवाराने नौकरभर्ती बंदी विरोधात आवाज़ उठवावी, विनाअनुदानीत शाळा-महाविद्यालयांना  लवकर  अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करावे,  शासनाने बँकांना निर्देश द्यावे पदवीधर बेरोज़गारांना व्यवसायासाठी जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करावा,  शासनाने बेरोजगारांना बेकारी भत्ता द्यावा पदवी बेरोजगार दहा हज़ार रु.भत्ता पदयुत्तर बेरोजगार बारा हज़ार रु.व व्यावसायिक बेरोजगाराला पंधरा हज़ार रु. भत्ता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा,  वरील आश्वासने देणारा व निवडून आल्यावर काम करणा-या उमेदवाराचा विचार आपण करावा असे आवाहन मतदारांना लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter