बेजबाबदारपणे फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई; शारदा दळवी यांचे सर्व स्तरातून कौतुक.

(बीड प्रसार न्युज नेटवर्क)
आष्टी/तुकाराम गणगे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करत असूनही काही नागरिक जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आज दि १७/०४/२०२० रोजी सकाळी ७ ते ९:३० या दरम्यान संचारबंदी शिथिलतेच्या काळात काही नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरत होते अशा नागरिकांना श्रीमती शारदा दळवी मुख्याधिकारी नगर पंचायत आष्टी व त्यांचे कर्मचारी यांनी पकडून दंड ठोठावला. यामध्ये आठ लोकांनी चेहऱ्यावर मास्क न लावणे व एक व्यक्ती किराणा घेण्याकरीता दुचाकीवरुन फिरणे. याकरिता दंड ठोठावण्यात आला. एकूण दंड पाच हजार पाचशे (५५००/-) एवढा गोळा करण्यात आला.
या दंडात्मक कारवाईमुळे नगर पंचायत प्रशासनाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाही काही नागरिक विनाकारण शहरात फिरतात यावर उपाय म्हणून अशा लोकांकडून साफसफाई करुन घेतली. यापुढे जो कोणी विनाकारण फिरताना दिसल्यास त्यांच्याकडून नाली, रस्ते साफ करुन घेण्यात येईल, याची खबरदारी शहरातील नागरिकांनी घ्यावी असे आवाहन धडाकेबाज,कार्यतत्पर श्रीमती शारदा दळवी मुख्याअधिकारी नगरपंचायत आष्टी यांनी केले आहे.








