नळपट्टी, घरपट्टी, दुकानांचा किराया माफ करण्याची युथ क्लबने मुख्यकार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या कडे केली मागणी

धारूर/नाथ ढगे
धारूर येथील सामाजिक संघटना युथ क्लबने लॉक डाऊन काळातील तीन महिन्यांची नळपट्टी ,घरपट्टी व दुकानांचा किराया माफ करण्याची मागणी आज धारूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास हजारे व ग्रामीण भागा करिता गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे
जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे त्यामुळे शासनाला लॉक डाऊन सारखे कठोर पाऊल उचलावे लागले यातून जनजीवन विस्कळीत झाले आहे सर्व लोक घरातच बसून आहेत काम धंदा बंद आहे हातात पैसे नाहीत सर्वसामान्य व्यक्तीची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे
त्यामुळे सामाजिक जबाबदारी समजून धारूर नगरपरिषदेने लॉक डाऊन काळातील तीन महिन्याची नळ पट्टी, घर पट्टी व नगरपरिषदेच्या ताब्यात असलेल्या दुकानाचा किराया माफ करण्याची मागणी युथ क्लब या सामाजिक संघटनेने केली आहे
यावेळी युथ क्लब अध्यक्ष सुरेश शिनगारे, सचिव अविनाश चिद्रवार , नितीन शुक्ला, माजी अध्यक्ष सूर्यकांत जगताप, रवी गायसमुद्रे, पत्रकार नाथा ढगे तसेच युथ क्लब चे सदस्य उपस्थित होते युथ क्लब या संघटनेने नागरिकांचा जिव्हाच्या प्रश्ना बाबत निवेदन दिल्याने धारूर शहरात त्यांचे आभार मानले जात आहेत








