पालघर हत्याकांड जबाबदार कोन ..?

Beed

गुन्हेगारी प्रव्रत्तीला खतपानी घालनारी भ्रष्टाचारी व्रत्ती, कुचकामी पोलिस यंत्रनाच घडवत आहे अट्ल गुन्हेगार व कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवनारे किंग कोब्रा....... !

( निमीत्त पालघर साधू हत्यांकांड )

पालघरमधील हत्याकांड ही लज्नास्पद घटना असून दोषींवर कारवाई होनारच अशी माहीती मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी दीली , गुरुवारी रात्री पालघर मधील एका गावात साधूंना  क्रूरतेने ठार मारल्याची घटना घडली त्यानंतर सोशल मिडीयावर त्या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेद्र फडनवीस यांनी उच्चस्तरीय चैकशीची मागनी केली , परंतू अशा घटना घडतातच कशा ते आपन पाहूया 2 साधू 1 ड्रायव्हर आणि पोलीस कर्मचाऱ्यावर ह्ल्ला करनारे सर्व आरोपी अटक केली , पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाला तर त्यांनी साधुंना व स्वतहाला वाचवन्यासाठी काय केले ? हवेत गोळीबार का केला नाही व अशाच प्रकार चे ईतर प्रश्न .. ! ततपूर्वीच जागतीक करोना महामारी दरम्यान संचारबंदी , लकडाउन च्या काळात एवढया मोठया प्रमानात लोक वेगवेगळया प्रकारची हत्यारे घेउन जमतातच कशी , तोपर्यंत पोलिस काय करतात? पोलिसांच्या समोर , लोकप्रती नीधीच्या समोर निरपराध साधूवर हल्ला करुण त्यांना ठार केले जाते त्यावेळी काशीनाथ चैधरी नावाचे पंचायत सदस्यही तेथे होते,आशाच प्रकारच्या निर्भया हात्याकांडा सारख्या कित्येक घटना वारंवार महाराष्ट्राच्या मातीत पवित्र संताच्या भूमीत घडत आहेत याचा अर्थ काय समजायचा आपली कुचकामी पोलीस यंत्रना की पोलीस दलात मोठया प्रमानात बोकाळलेल्या भ्रष्ट्राचारामुळे निरधास्त झालेली गुन्हेगारी प्रव्रत्ती याचे उत्तर कोठे मीळल... !
          
पोलिस भ्रष्ट्राचाराचे पडसाद नुकत्याच झालेल्या विधान परीषदेच्या सभाग्रहात उमटले उल्हासनगर सेंट्रल पोलीस ठान्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक प्रशांत चतुर्भुज यांना जुगाराचा अड्डा बंद न करण्यासाठी एक लाख चाळीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीने सापळा रचून 7 मार्च 2020 रोजी रंगेहात पकडले त्या पोलीसांची चैकशी केल्यानंतर ते डीसीपी क्राईम यांच्या सांग न्यावरून लाच स्वीकारत असल्याची धक्कादायक माहीती त्या आरोपीने तपासात दीली आहे अशी माहीती कॉग्रेसच्या आमदार हुस्नबानू खलिफे यांनी औचीत्याच्या मुद्याद्वारे विधान परीषद सभागृहात मांडली याचप्रमाने आपल्या देशात , राज्यात , शहरात , गावात विभागात भ्रष्ट्राचाराची पाय ,मुळे अधीक घट्ट होताना दीसून येत आहेत कोनत्याही क्षेत्रात भ्रष्टाचार आपल्या चरम सिमेवर पोहचला आहे रेशन दूकानदार गरीबांचा माल खाउन गब्बर होतोय तर त्याला पूरवठा अधीकाऱ्याची दबरदस्त साथ मीळत आहे त्याच प्रमाने अवैध दारु नीर्मिती व विक्री , गुटखा बंदीचे तीन तेरा शहरात कोनत्याही ठिकानी अगदी सहज पने उपलब्द होनारा गुटखा अगदी पोलीस स्टेशन शेजारीही ज्यांच्या खांद्यावर देशाची भावी पीढी घडवन्याचे आव्हान आहे तीच पोलिस यंत्रणा मनात आनले तर काहीही करू शकते पन त्यांना काहीच करायचे नाही हे नक्की.. ! , ते फक्त गुन्हेगारी प्रव्रतीला खतपानी घालायचे काम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पने करत आहेत यामुळेच पोलिसांची प्रतिमा नागरीकात मलीन होताना दीसून येत आहे तर  कायद्याची भीती नष्ट होत चालली आहे अशा प्रकारच्या भष्ट्राचारी व्रत्तीतूनच कायद्याची पायमल्ली करनारे किंग कोब्रा जन्माला येत आहेत या भ्रष्टाचारी आसुरी शक्तीला वेळीच आवर घालने गरजेचे आहे
  

Sharing

Visitor Counter