हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना अनिल भाऊ समुद्रे मित्र मंडळचा मदतीचा हात
Dharur

किल्लेधारुर/प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या असंघटित कामगार, मजूर, रोजंदारी मजूर,घरकाम करणार्या बांधकाम- काम करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी.
अनिल भाऊ समुद्रे मित्र मंडळच्या वतीने विर पांडुरंग चौक ,फुले नगर,अण्णाभाऊ साठे नगर येथील गोरगरिबांना १५ दिवस पुरेल एवढे किराणा सामान सोशल डिस्टन्सचे पालन करुन मोफत वाटप करण्यात आले.
या वेळी अनिल भाऊ मित्र मंडळचे अध्यक्ष अनिल समुद्रे,महादेव वाघमारे,अविनाष समुद्रे,भागवत गायसमुद्रे,सनी गायसमुद्रे,संजय सिरसट,शैलेंद्र गायसमुद्रे,जितेंद्र गायसमुद्रे,धर्मराज गायसमुद्रे.ई यावेळी उपस्थित होते.








