वार्ड क्र.१५ चे नगरसेवक खदिर भाई जवारी वाले यांचा निधन

Beed

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील अजीज पुरा प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक अब्दुल खदीर अब्दुल गणी (खदिर भाई जवारी वाले )यांचे हृदयविकाच्या झटक्याने आज सकाळी निधन झाले.

(आज दुपारी तीन वाजता दफनविधी तकिया मज्जित कब्रस्तान याठिकाणी करण्यात येणार आहे)

अब्दुल खदिर भाई जवारी वाले यांना आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु याठिकाणी डॉक्टरने मृत घोषित केले.त्यांच्या निधनाची माहिती कळताच सर्वांना धक्का बसला .

खदिर भाई यांच्या पश्चात दोन मुले ,तीन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे खदिर भाई यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात बीड  प्रसार परिवार सहभागी आहे.

Sharing

Visitor Counter