लाॅकडाऊनच्या काळात गाव पुढारी कोणत्या बीळात बसले? भुकेने व्याकुळ गोर गरीबांचा सवाल

गेवराई/प्रतिनिधि
देशाच्या राजधानी दिल्लीसह राज्यभरात कोरोनाच्या सावटा़खाली आज प्रतेक नागरिक वावरत असुन आज रोजी आठवडी बाजाराच्या हिशोबात कुठे चौथा बाजार कुठे पाचवा तर कुठे सहाव्या आठवडा ऊलटला आसतांना एकी कडे कोरोना आजाराचे सावट तर दुसरी कडे भुकेने व्याकुळ गोर गरीबांचा हाल पाहावयास दिसत आहेत.
या संकटाच्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार ठिक ठिकाणचे जिल्हा प्रशासन कोरोना सारख्या महाभंयकर महामारीचा सामना करन्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करत आसतांना भुमहिन व रोजंदारीवर जगना-या कामागारा बरोबरच भंटकंती करना-या गोर गरीबांच्या रोजी रोटीचा प्रश्न सोडवनार कोण आशा परिस्थितित शासनाने बी. पी. एल व अंतोदय योजने अंतर्गत प्रतेक नागरिकांना पाच किलो तांदुळची घोषणा करुण त्याची काटेकोरपने अमलबजावनी देखील झाल्याचे चित्र सर्वत्र पाहन्यास मिळाले.
पुरवठा विभागाने कुटुंबातील सर्व व्यक्तिचे आधार लिंक केलेले नसल्यामुळे उपलब्ध तांदुळाने कुटुंबातील सर्व सदस्यांची समस्या सुटलेली नसल्यामुळे त्यांच्या बरोबरच भंटकंती करना-या व रोजंदारीवर जगना-या गोर गरीबांची भुकेने व्याकुळ आवस्था झाल्याचे चित्र सर्वत्र पाहन्यास मिळत आसतांना मताचा जोगावा मागनारे गाव पुढारी कोणत्या बीळात जाऊन बसले आहेत आसा? सवाल भुकेने व्याकुळ नागरिकातुन उपस्थित होऊ लागला आहे.
शासनाने शेतक-यांना २०० हजार व जनधन खातेधारकांना ५०० रुपये खात्यावर जरी टाकले आसले तरी भुमहिन व खातेदार नसलेल्या गोर गरीबावर ऊपासमारीची वेळ आलेली आसतांना निवडनुकाच्या काळात घरोघर मताचा जोगावा मागनारे माजी,आजी गाव पुढारी ,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,गावचे सरपंच व सर्व पुढारी या संकटाच्या बिकट परिस्थिति पुढे येऊन सहकार्य करन्या एैवजी कोणत्या बीळात बसले आहेत ?आसा सवाल भुकेने व्याकुळ गोर गरीबातुन उपस्थित होऊ लागला आहे.








