गरिबांच्या चुली पेटवित धन्वंतरीच्या सेवकांनी संवर्धिले माणुसकीचे मुल्य

डॉ.शरद शिंदेंचा सामाजिक वसा:गरजूवंताना केले किराणा मालाचे वाटप
बीड/प्रतिनिधी
दि.२७ सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णताः विस्कटली आहे. त्यामुळे त्यांच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ही भयवाह परिस्थिती लक्षात घेता, संवेदनशील डॉ.शरद शिंदे यांनी त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च न करता शहरातल्या माळीवेस भागांमध्ये आर्थिक, दुर्बल घटकातील कुटुंबीयांना किराणा मालाचे वाटप केले आहे. धन्वंतरीच्या या सेवकांनी गरीबांच्या चुली पेटवून माणुसकीचे मुल्य संवर्धित करण्याचे काम केले आहे.
बीड येथील नामांकित द्वारका हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.शरद शिंदे यांनी आपल्या पत्नी सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.उर्मिला शिंदे यांचा वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून गोरगरिब कुटुंबीयांना किराणा मालाचे वाटप करून त्यांच्या चुली पेटविण्याचे काम केले आहे. डॉ.शरद शिंदे यांनी बीड शहरामध्ये राबविलेल्या या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
सध्या कोरोनामुळे जगासमोर एक मोठे संकट उभा राहिले आहे. त्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य लोकांना अधिक बसला आहे. देशात गेल्या मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजगार, उद्योगधंदे, दळणवाहतूक पूर्णपणे बंद आहे. असे झाल्याने लोकांच्या हाताला कामधंदा नाही, म्हणून परिस्थिती आणखीणच बीकट झाली आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टी गांगीर्याने लक्षात घेत, शहरातील माळीवेस भागातील गरजूवंत कुटुंबीयांना आम्ही किराणा मालाचे वाटप केले आहे. तसे पाहिले गेले तर घरातील व्यक्तींचे वाढदिवस साजरे करीत असताना सामाजिक कार्य हाती घेवूनच साजरे करीत आलेलो आहोत.
असल्याच्या भावना डॉ.शरद शिंदे यांनी मदत वाटपावेळी व्यक्त केल्या. यावेळी रिपाइं युवा शहराध्यक्ष अमर विद्यागर, निखील सवाई, शुभम सवाई, दयानंद ससाणे, प्रदिप भापुडे, संदिप पालके, राकेश सवाई यांची उपस्थिती होती.








