मोरफळी येथे चोरट्यांनी तीन घरे फोडली दागिने रोकड लंपास

किल्ले धारूर (इरफान शेख) धारूर तालुक्यातील मोरफळी येथील तीन घरे चोरट्यांनी मध्यरात्री फोडून दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की धारूर तालुक्यातील मोरफळी येथील धोंडीराम ज्ञानोबा कोळेकर यांचे गावात घर आहे घरातील सर्व मध्यरात्री झोपले असताना चोरट्यांनी घर फोडून घरातील 2 अंगठी, 75000 रू दागिने , रोख रक्कम 45000 रू लंपास केले आहे
शिंदे तुकाराम ज्ञानोबा व श्रीकांत एकनाथ शिंदे हे बरड वस्तीवर शेतात राहतात घरा समोरील मोकळ्या पटांगणात झोपले असता यांच्याहे घर मध्यरात्री चोरट्यांनी फोडून घरातील दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे घरातील सामान अस्ताव्यस्त करून टाकले होते या प्रकारामुळे मोर फळी गावात घबराहट निर्माण झाली आहे सद्या लॉक डाऊन असल्याने धारूर तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भालेराव करत आहेत








