नेकनूर येथे झीरो डेट मिशन कुटुंब सर्वेक्षण उपक्रमास सुरुवात

नेकनूर येथे झीरो डेट मिशन कुटुंब सर्वेक्षण उपक्रमास सुरुवात
नेकनुर/प्रतिनिधी
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. बीड श्री.अजित कुंभार यांनी झिरो डेट मिशन हा उपक्रम हाती घेतला आहे या मोहिमेत प्राध्यापक व आरोग्य कर्मचारी,आशा सेविका यांच्या कडून आज नेकनूर येथे सुरुवात करण्यात आली हा उपक्रम 24 एप्रिल 10 मे या कालावधीत कोरोना संसर्ग प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यादरम्यान प्रत्येक घरी जाऊन किमान शंभर कुटुंबाचा सर्वे दररोज घेण्यात येत आहे. यामध्ये प्रमिला देवी पाटील महाविद्यालयातील प्राध्यापकांचा सहभाग मोलाचा आहे.त्यामध्ये प्रा.शेख वसीम आरेफ, प्रा.बचुटे जी. डी प्रा. करडकर,प्रा आंधळे डी.ए. इत्यादी प्राध्यापकांनी नेकनूर व नेकनूर परिसरातील सर्व नागरिकांचा गटनिहाय सर्वेक्षण करत आहेत.या मध्ये प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी तसेच होम आलगीकरण इत्यादी बाबी चा सल्ला ही देण्यात येत आहे. सोशल डिस्टंसिंग चे नियम, सॅनिटायझरचा वापर , वारंवार हात धुणे,सहा फुटाचे अंतर ठेवणे, ताप, खोकला, शिंका येत असेल तर वैद्यकीय अधिकाऱ्याकरवी तपासणी करून घ्यावी. तसेच व्याकसीन लस घेण्यासाठी ही प्रवृत्त करण्यात आले. यातुन कोरोना संसर्ग सारख्या आजाराला रोखण्यासाठी मदत होईल. याप्रसंगी प्रत्येक नागरिकांचे तापमान किती, ऑक्सिजन लेवल तपासण्यात येत आहे. शुगर,बीपी पेशन्टाना सल्ला देण्यात येत आहे. इत्यादी तपासणी करण्यात आली या झिरो डेट मिशन कार्यासाठी नेकनूर येथील नागरिक उदंड प्रतिसाद देत आहेत. हे सर्वेक्षण करताना महाविद्यालयाचे प्रा वसीम आरेफ व इतर प्राध्यापक तसेच नेकनूर येतील पत्रकार बंधु याप्रसंगी उपस्थित होते.








