धारुर शहरात घाणीचे साम्राज्य संसर्गजन्य रोगांची नागरिकांन मध्ये भिती

Beed

धारुर शहरात घाणीचे साम्राज्य संसर्गजन्य रोगांची नागरिकांन मध्ये भिती

किल्लेधारुर/प्रतिनिधी

'स्वच्छ भारत...स्वच्छ शहर'चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, धारुर शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अन शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे.

"देशपातळीपासून ते गावपातळीपर्यंत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावाकरिता लाखो, करोडो रुपयांचा निधी वितरीत केल्या जातो. अन तो निधी नागरिकांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने केला जातो. मात्र, त्या निधीची विल्हेवाट स्वच्छतेच्याच दृष्टीने करणे हे काम स्थानिक प्रशासनाचे असते व त्या निधीतून शहर स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्त्वाचे असते."
- रवी गायसमुद्रे (सामाजिक कार्यकर्ता )
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे
मच्छी मार्केट रोडवर दुर्गंधीयुक्त गटारीचे पाणी कित्येक वर्षांपासून रोडवर वाहत असून, स्थानिक नागरिक तसेच जाणारे-येणारे नागरिक महिलांना त्याचा त्रास होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी यात लक्ष घालावे.

Sharing

Visitor Counter