करनी केलेल्या लिंबाचे सरबत करून पेलो , अंधश्रद्धा बाळगू नका , ग्रामीण भागातील जनतेला आवाहन -- डॉक्टर गणेश ढवळे

करनी केलेल्या लिंबाचे सरबत करून पेलो , अंधश्रद्धा बाळगू नका , ग्रामीण भागातील जनतेला आवाहन -- डॉक्टर गणेश ढवळे
बीड ( रिपोर्टर-- गोरख मोरे )
आज दिनांक 27 एप्रिल 2021 मंगळवार रोजी सकाळी 6 वाजता फोन आला गावातील दादा रवींद्र वाणी यांचा , म्हणाले डॉक्टर साहेब पोलिसांना फोन करतात का ? मी म्हणालो काय झालं ? मला वाटलं चोरी झाली की काय ? ते म्हणाले नाही , घरासमोरील व्हरांड्यात कोणीतरी सुई टाचलेले लिंबू , कुंकू , हळद लावून करणी करण्याचा प्रयत्न केलाय , तुम्ही पोलिसांना बोलवा , मी म्हणालो पोलिसांना कशाला माझ्याकडे त्याचा तोड आहे , मी गेलो ते अगोदरच भयभीत झालेले दिसले , काय झालं म्हणून सविस्तर विचारलं ते म्हणाले आमच्या घरात जितके माणस आहेत तितकेच सुया लिंबाला टोचल्या आहेत , आणि आमच्यावर करणी करून घातपात करण्याचा प्रयत्न आहे .
करणीच्या लिंबाचे सरबत करून पिलो
त्यांना म्हणालो घाबरू नका , माझ्याकडे याचा तोडगा आहे , चाकू आणि साखर आना , त्यानंतर लिंबाला टोचलेल्या सुया काढल्या , कुंकू , हळद साफ करून घेतले , आणि लिंबू कापून त्याचे सरबत करून पिलो , त्यांना सांगितले की अंधश्रद्धा आहे अशाप्रकारे कोणी कोणाचं काहीही नुकसान करू शकत नाही , माणूस आपल्या कर्माने बरं वाईट करत असतो , ग्रामीण भागातील या प्रकरणी केल्याच्या अंधश्रद्धेमुळे भाऊबंदकी एकमेकाच्या मुळावर उठले , भांडणं होतात ते थांबवायला हवं म्हणून एक छोटासा प्रयत्न प्राध्यापक . हनुमंत भोसले केजकर यांचा मी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे , अंधश्रद्धा बाळगू नका , ग्रामीण भागातील जनतेला डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर यांनी याप्रसंगी केले आव्हान .








