जिल्ह्यात आढळले केवळ ५३ शाळाबाह्य मुले

जिल्ह्यात आढळले केवळ ५३ शाळाबाह्य मुले
सर्वेक्षण कसे झाले असले हा संशोधनाचा विषय - मनोज जाधव
बीड/प्रतिनिधी
शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण मार्च अखेर करण्यात आले . यामध्ये जिल्ह्यात ३ ते १८ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले . त्यात ५३ बालके शाळाबाह्य आणि अनियमित उपस्थिती असलेले २१४ असे एकूण २६७ बालके शाळा बाह्य आढळून आले आहेत .
पोटाची खळगी भरण्यासाठी होणारे पालकांचे स्थलांतर , कौटुंबिक परिस्थिती , पालकांचे अज्ञान , शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत आहे . शिक्षण हक्क कायद्याची ( आरटीई ) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षनामध्ये ५३ मुले हे कधीही शाळेत गेले नाहीत असे समोर आले आहे. यात ३४ मुले तर १९ मुलींचा समावेश आहे. त्याच बरोबर शाळेत अनियमित उपस्थिती मुळे २१४ बालके शाळाबाह्य झाले आहेत. यामध्ये ८८ मुले तर १२६ मुलींचे प्रमाण आहे. या सर्वेक्षणात सर्वाधिक बीड आणि गेवराई तालुक्यात प्रतेकी १८ बालके शाळाबाह्य आढले तर केज, परळी, शिरूर आणि वडवणी या तालुक्यात एकही बालक शाळाबाह्य नसल्याचे समोर आले आहे.
तालुके मुले मुली एकूण
अंबाजोगाई 0 1 1
आष्टी 6 1 7
बीड 10 8 18
धारुर 0 2 2
गेवराई 13 5 18
केज 0 0 0
माजलगांव 2 1 3
परळी 0 0 0
पाटोदा 3 1 4
शिरुर 0 0 0
वडवणी 0 0 0
एकूण 34 19 53
बीड जिल्हा हा प्रमुख्याने ऊस तोड मजुरांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात लाखो ऊसतोड मजूर स्थलांतर करतात यात त्यांच्या मुलांची देखील फरपट होते. परिणामी ते शिक्षणा पासून वंचित राहतात. त्याच बरोबर सद्या कोरोना मुळे देखील अनेक विद्यार्थी या वर्षी शाळेत जाऊ शकले नाहीत. यातच शिक्षण विभागाने केलेले सर्वेक्षनात फक्त ५३ बालके शाळाबाह्य आढळतात त्यामुळे हे सर्वेक्षण कसे झाले असले हा संशोधनाचा विषय आहे. असे मत शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी म्हंटले आहे.








