किल्ले धारुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिनगारे यांचा कोविड केंद्रावर योग वर्ग

Beed

किल्ले धारुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिनगारे यांचा कोविड केंद्रावर योग वर्ग 

किल्ले धारुर/प्रतिनिधि

 शहरातील किल्ले धारुर युथ क्लबचे माजी अध्यक्ष तथा सहशिक्षक सुरेश शिनगारे यांना गेल्या सात आठ दिवसांपूर्वी थोडा त्रास होऊ लागला असल्याने कोविड चाचणी केली असता पॉझिटिव्ह आले होते.  किल्ले धारुर शहरातील घागरवाडा रस्त्यावरील कोविड केंद्रात दाखल झाले. या केंद्रावर शंभर कोरोना रुग्ण असल्याने या रुग्णांमध्ये ज्येष्ठ युवक, ज्येष्ठ नागरिक व महिलांचा समावेश आहे. 
     बहुतांश ज्येष्ठ नागरिक हे कोरोना झाल्याने त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण होते परंतु सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे युवक सुरेश शिनगारे हे कोविड केंद्रावर कोरोना झालेला असतानाही सुद्धा शांत बसले नाहीत. त्यांनी या ज्येष्ठ नागरिकांना केंद्रावर सुद्धा जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली. त्यांना मानसिक दृष्ट्या आधार देण्याचा काम केलं. 
      आज सकाळी या ज्येष्ठ नागरिकांना कोविड केंद्राच्या आतील बाजूस सर्वांना एकत्रित करत योगासनाचे धडे देत योग वर्ग घेतला.  योग वर्गात या नागरिकांना कोरोना संसर्गास न घाबरता सक्षमपणे तोंड देत आनंददायी राहण्याचे आवाहन केले.
    आज सुरेश शिनगारे यांना सुट्टी झाली त्यावेळी कोविड केंद्रावरील जेष्ठ नागरिकांनी त्यांना आमच्यातील भिती घालण्यासाठी खुप मोठा आधार मिळाला असे उद्गार काढत आभार मानले.
    यावेळी वडवणी येथील गुरसाळे व आवरगाव येथील विशाल जगताप यांनी योगासने घेत मार्गदर्शन केले.

Sharing

Visitor Counter