धारूरचे अमन सिरसट यांची एपीआय पदी पदोन्नती युवा पत्रकार संघाने सत्कार करून दिल्या शुभेच्छा

धारूरचे अमन सिरसट यांची एपीआय पदी पदोन्नती
युवा पत्रकार संघाने सत्कार करून दिल्या शुभेच्छा
किल्ले धारूर/प्रतिनिधी
धारूर शहरातील कसबा विभागातील बीड जिल्हा पोलीस खात्यात अंबळनेर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमन सिरसट यांची एपीआय पदी पदोन्नती झाली आहे त्याबद्दल त्यांचा युवा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
बीड जिल्हा पोलीस खात्यात अंबळनेर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक व धारूर शहराचे भूमिपुत्र सर्वसामान्य कुटुंबातील असून अत्यंत हुशार शांत हसतमुख अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे श्री.अमन सिरसट यांनी अतिशय कमी वयामध्ये 20 व्या वर्षी स्पर्धा परीक्षेतून उपनिरीक्षक पदी निवड झाली नंतर गडचिरोली या ठिकाणी 3 वर्षे कर्तव्य बजावले जालना येथे 3 वर्षे त्यांनी आत्ता
एपीआय पदी पदोन्नती मिळवली आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण धारूर शहरांमध्ये झाले तर पुढील शिक्षण सातारा येथील नवोदय विद्यालय मध्ये झाले त्यांना स्पर्धापरीक्षेची आवड असल्याने स्पर्धा परीक्षेतून 20 व्या वर्षीच त्यांनी उपनिरीक्षक या पदाला गवसणी घातली गडचिरोली नक्षलवादी एरिया मध्ये कमांडो म्हणून अतिशय खडतर प्रवासामध्ये त्यांनी आपले कर्तव्य बजावले असे या कर्तृत्ववान व्यक्तीचा धारूच्या भुमिपुत्राचा सत्कार धारुर युवा पत्रकार संघाच्या वतीने करून त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी युवा पत्रकार संघाचे नाथा ढगे अतुल शिनगारे , ईश्वर खामकर ,रवी गायसमुद्रे ,सतीश पोतदार, अतीक मोमिन, शेख इरफान ,अविनाश जगताप इत्यादी उपस्थित होते








