किल्ले धारुर शहरातील १९८४ च्या वर्ग मित्रांचा कोरोना महासंकटात ग्रामीण रुग्णालयास बेड्सची मदत

Beed

किल्ले धारुर शहरातील १९८४ च्या वर्ग मित्रांचा कोरोना महासंकटात ग्रामीण रुग्णालयास बेड्सची मदत 

    किल्ले धारूर शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील १९८४ च्या दहावीचे ७५ सदस्य आहेत. या मिञ व मैत्रिणी यांचे दर वर्षी दिवाळीला स्नेहमिलन कार्यक्रम ( गेट टुगेदर ) होते. या स्नेहमिलनात मिञ काही प्रमाणात कमी जास्त हजर असतात. १९८४ च्या ग्रुपचे काम कठीण काळ असताना मित्राला आर्थिक मदत करणे तसेच मित्रांच्या मुल मुलींच्या लग्नात सर्व मिळून पाहुण्याचे स्वागतास मदत करने व उपयोगी पडणारी वस्तू तेही मुलीला व मुलाला विचारुन देणे जे की ते या मित्रपरिवाराने दिलेला आहेर आनंदाने जपून ठेवतात. एखाद्यास अडचणीच्या काळात आर्थिक मदत व आरोग्य संदर्भातील अडचण सर्व मित्र मिळून करतात. विशेष यामध्ये या समुहातील मिञ डॉक्टर, इंजिनिअर व्यापारी, कामगार, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक सर्व क्षेत्रातील आहेत. आपआपल्या सर्वजण कुवती प्रमाणे मदत करीत असतात. कोणी कमी अधिक प्रमाणात मदत केली त्यावर मित्र परिवार चर्चा करीत नाहीत यामुळे आतापर्यंत मित्रप्रेम टिकले असल्याने भविष्यात मित्रांची खरी गरज एकमेकांना भासणार आहे.
     मित्रांनी जागतिक कोरोना संसर्गाने दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अत्यावश्यक असणाऱ्या सुविधा या कमी पडत आहेत. विशेषतः ऑक्सिजन व रेमडिसिवर सारख्या सुविधा कमी प्रमाणात मिळत असल्याने रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होऊन जिव जात आहेत. 
      कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने काही भौतिक सुविधा ह्या पण कमी पडत आहेत त्यामध्ये पलंग व गाद्या हे सुद्धा सध्या मिळेनासे झाले आहे. आरोग्य विभागाकडे किंवा प्रशासनाकडे पलंग व गाद्या असून असून किती असणार याला पण काही बंधन आहेत परंतु दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने १९८४ च्या वर्गमित्रांनी एकत्रित येत किल्ले धारूर शहरातील ग्रामिण आरोग्य रुग्णालयास पलंग गादीसह असे पंधरा बेड्स सामाजिक हेतूने भेट म्हणून दिले आहेत.
       किल्ले धारुर तहसिल कार्यालयाच्या तहसिलदार शिडोळकर मॅडम यांच्या उपस्थितीत किल्ले धारुर शहरातील ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.आदमाने साहेब यांच्याकडे अजयसिंह दिख्खत, प्रा.नितेंद्र शुकला, लक्ष्मण ढगे, नंदकुमार निक्ते, व्यंकटेश वेदपाठक, दिलिप नाना सावंत, बाळु शेठ तोष्णिवाल, नागनाथ गायके, नितिन सद्दिवाल, अनंत काळे, राजु महामुनी, विपिन मिश्रा, मंगल काळे, भगवान उकंडे व अन्य वर्गमित्रांनी कोरोना महासंकटात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी मदत केली आहे.
     यावेळी प्रकाश काका काळे साहेब, अनिल महाजन सर, सदानंदजी खिंडरे साहेब, महादेव देशमुख सर, प्रा.विजय शिनगारे, सुर्यकांत जगताप उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter