कोरोना महामारीत होरपळतोय सामान्य रुग्ण ?- डॉक्टर जितीनदादा वंजारे

Beed

कोरोना महामारीत होरपळतोय सामान्य रुग्ण ?- डॉक्टर जितीनदादा वंजारे
     
बीड/वार्ताहर 

बीड जिल्हा- ग्राउंड रिपोर्ट -जगात सध्या थैमान घातलेल्या जीवघेन्या कोरोना या विषाणू मुळे महामारी झाली आहे .लोक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत या भीतीने रुग्ण घरीच अंगावर दुखने पेलतो आहे आणी त्यामुळे टायफॉईड,मलेरिया आणी विविध तापेचे आजार वाढताना दिसत आहेत.ते अंगावर काढल्याने रुग्णाचे बेहाल होताना दिसत आहे.म्हणून रुग्णांनी घाबरून न जाता आपल्या फॅमिली डॉक्टराणा दाखवून घेऊन योग्य सल्ला व उपचार घेतले पाहिजेत असे आव्हाहन हिमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉक्टर जितीनदादा वंजारे यांनी केले आहे.
        आज कोविड-19 या रोगाचे भयानक वास्तव व त्याचे विधवंसक परिणाम सर्व जगाला माहित झाले आहेत.आणी त्याची व्यापकता लक्षात घेऊन रुग्ण आपापले छोटे मोठे लक्षणे लपवून डॉक्टर ला मोजकिच लक्षण सांगत आहेत त्यामुळे कोविड -19 ची परिस्थिती आणखीनच गंभीर होताना दिसते आहे.तसेच इतर आजाराचेही रुग्ण वाढताना दिसत आहेत याला भारतातील सोशल मीडिया आणी टीव्ही मीडिया पण जबाबदार आहे असे बोलले तरी वावघ ठरणार नाही कारण या रोगाची भीतीखूप वाढली आहे लोक रोगाची लक्षणे सांगत नाहीत .व्हिडीओ पाहून टीव्ही पाहून चांगला माणूस पण घाबरून जाईल अशीच परिस्थिती आहे .त्यामुळे आजारी पडल्यास अशी कोविड ची लक्षण असली तरी लोक सांगत नाहीत. आणी अश्या वेळी जर कोविड असला तरी  एकतर तो न सांगितल्यामुळे त्याचा प्रसार वाढतो आहे आणी रुग्णांनी योग्य ट्रीटमेंट न घेतल्याने रुग्ण मृत्यू पावत आहेत.खेड्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात कोवीडचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.पण कोविड बरोबरच इतर तापेचे आजार  वाढताना दिसत आहेत.तरी रुग्णांनी सर्व जाणवत असलेली लक्षणे निसंकोचपणे आपल्या डॉक्टराणा खरे खरे सांगावे,होणारा त्रास जश्याच तसाच सांगावा,लपवालपवी करू नये.सामान्य फॅमिली डॉक्टराणी सुचवलेली तपासणी करून घ्यावीत आणी कोविड-19 ची लक्षणे खालीलप्रमाणे असतील तर लगेच आरटी पी सी आर किंवा अँटीजण टेस्ट करून घ्यावीत.कोविड ची लक्षण- ताप येणे,डोळे लाल होणे,अगदीच गळून गेल्यासारखे वाटणे,प्रचंड थकवा,अंगदुःखी,अशक्तपणा,तोंडाला चव नसणे,नाकाला वास न येणे,सर्दी ,खोकला,प्रचंड घसा दुखणे,आवाज बदलणे,आणी श्वास घेण्यास प्रतीरोध होणे,धाप लागणे,पायऱ्या चढल्यास प्रचंड दम भरणे,छातीत जडपणा येणे.इत्यादी लक्षणें आढळ्यास आपल्या फॅमिली डॉक्टराणा दाखवा घरीच राहु नका किंवा डायरेक्ट टेस्ट करण्यासाठी जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन कोविड-19 ची टेस्ट करावी.
           *डॉक्टरांसाठी* :- विषय असा आहे की तोंडाला चव नसणे ही लक्षणें टायफॉईड या आजाराची पण आहेत मग यात गोंधळ होतोय आता मी स्वतः परीक्षनातून अभ्यास पूर्ण सांगू शकतो की सध्या ग्रामीणभागात कोविड-19 पेक्षा टायफाईड ची साथ जास्त चालू आहे.टायफॉईड ची लक्षणें खूप जास्त ताप येणे ,तोंडाला चव नसणे,तापेत चढ उतार असणे,उलटी मळमळ,डोळे लाल होणे,जुलाब लागणे पोटात दुखणे अशी आहेत ज्यातली काही लक्षणें कोरोना मधेही आहेत त्यामुळे ग्रामीण भागात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टराणी आयव्ही फ्लूड लावन्या अगोदर रुग्णांची कोविड, विडाल,सिबीसी,सीआरपी,युरीन,इएसआर,पी एस फॉर एमपी इत्यादी टेस्ट करणे गरजेच्या आहेत.त्या पाहून उपचाराची दिशा बघणे गरजेचे आहे नसता कोविड न्यूमोनीया या आजारात आय व्ही फ्लूड द्याल तर त्रास जास्त वाढून रुग्ण दगावू शकतो.ह्याची दक्षता घेतली पाहिजे.
       सर्वच रुग्ण हे कोविड चे असल्यासारखे कोविड् सेंटर ला रुग्ण पाठवू नका.विनाकारण सामान्य रुग्णांना भीती घालू नका,त्यांना समजावून सांगा रक्त तपासणी करा आणी योग्य सल्ला व उपचार द्या.डॉक्टराणा देवाच्या जागी ठेवलं आहे ह्याची जान ठेवून आपल्याच घरातील एक व्यक्ती या प्रमाणे समजून उपचार करा.हा केवळ कमावण्याचा काळ समजू नका ,आपला व्यवसाय नसून सेवा आहे आणी सेवा हाच धर्म समजून वागल पाहिजे .ह्या निकडीच्या काळात माझ्या तमाम बीएचएमएस होमीओपॅथी च्या डॉक्टर बांधवाच   मी डॉक्टर संघटनेचा एक जबाबदार पदाधिकारी या नात्याने अभिनंदन करतो आपण जी खेड्यापाड्यात सेवा देताय ती सेवा कोणीही देऊ शकत नाही.ती सेवा अविरत ठेवा.रुग्णांची लुट करू नका आणी आपण ते करत नसणार याची मला खात्री आहे.आपण आपल शस्र आरसेनिक अल्बम- 30 सतत देत रहा,माझा वयक्तिक अभ्यास आहे मी ज्यांनाही ते औषधं दिलय आजपर्यंत त्यांना कोरोना शिवला नाही बाकी आपण ठरवा.
         *रुग्णांसाठी*
 डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर (होमीओपॅथीक तज्ज्ञ ) यांच्या सामान्य रुग्णांसाठी काही सूचना :-1)दररोज दोनदा अंघोळ करा.2)रोज पिवळ्या सालीची फळे संत्री, मोसंबी,लिंबूशरबत,हिरव्या पालेभाज्या,सलाड-काकडी,बिट,मोड आलेले कडधान्य,खा. 3)नॉनव्हेज जास्त खा.अंडी,मासे,मटण हाय प्रोटीन डायट घ्या.4)घसा धुऊन काढणारी द्रव्य सेवन करा-अँपल पिझ्झ,अँपल ज्यूस,नॉर्मल थंड असलेली फ्रुट ज्यूस,काढा,चहा अशी गरम पदार्थ दर तीन तासांनी घ्या.5)आदरक,लसूण,टोमॅटो,लिंबू,हळद,तुळशीची पाने आहारात जास्त वापरा. 6) गरम पाण्यात मीठ टाकून दर तीन तासांनी गुळन्या करा.तोंड हात पाय दर तीन तासांनी धुऊन घ्या.हात वारंवार साबनाने धुऊन घ्या. 8)भरपूर पाणी प्या,भरपूर जेवण करा ,मोकळ्या हवेत फिरायला जा.रात्री मोकळ्या हवेत छतावर झोपा.रात्री झोपताना खिडकी उघडी ठेवा. 9)आरसेनिक अल्बम 30 दहा ग्लोबुल रोज सकाळी झोपेतून उठल्यावर जेवणाअगोदर जिभेखाली ठेवा.दर महिन्याला पाच दिवस तीन महिने इत्यादी काळजी बाळगा ,सुरक्षित अंतर ठेवा ,गर्दीत जाऊ नका ,मास्क शिवाय घराबाहेर पडू नका,विनाकारण गर्दी टाळा,शासनाने दिलेली खबरदारी पाळा.

Sharing

Visitor Counter