तलवडा पोलीसांची कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना केले जेरबंद

तलवडा पोलीसांची कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना केले जेरबंद
बीड/प्रतिनीधी
दिनांक 01-05-2021 रोजी पोलीस ठाणे तलवाडा हद्दीमधील राजापूर शिवारात ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण वय 35 वर्ष व्यवसाय मजुरी रा . गोळेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड यांचे प्रेत नाकातून रक्त येत असलेल्या व गळ्यावर मारल्याचे निशाण असलेल्या अवस्थेत पडलेले असल्याची माहिती पोलीस ठाणे तलवाडा येथे मिळाली . या माहितीवरून सपोनि नवघरे आणि त्यांच्यासोबत स्टाफ असे घटनास्थळी तात्काळ पोहोचले . त्यावेळी पोलिसांनी दोन शासकिय पंचासमक्ष सदर प्रेताचा पंचनामा करून सदर प्रेतावर सरकारी दवाखाना तलावडा येथे पीएम करण्यासाठी नेण्यात आले . सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तलवाडा येथे आकस्मात मृत्यू क्रमांक 16/2021 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे नोंद करण्यात आली .त्यानंतर सदर मयता बाबत त्याचे नातेवाईक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 88/2021 कलम 302 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . सदर प्रकरणात पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने जलद गतीने सूत्र फिरून गोपनीय माहितीदाराकडून माहिती काढून , सदर मयत इसमास गोसावी वस्ती वरील नाना आप्पा शिंदे याने व मयताची पहिली पत्नी छाया ज्ञानेश्वर चव्हाण यांनी त्यांच्यात असलेल्या प्रेम संबंधा करिता अडथळा येत असल्याने यांनी कट रचून यातील मयत यास आरोपी नाना आप्पा शिंदे याने बोलावून दारू पासून राजापूर शिवारात रघुनाथ खेडकर यांच्या शेतात दोरीने गळा आवळून खून केला असे निष्पन्न करून नमूद दोन्ही आरोपितांना वरील गुन्ह्यात पोलिसांनी तपासात अटक केलेली आहे . सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नवघरे पोलीस नाईक 1485 वडकर पोलीस नाईक 1239 खाडे यांनी केली आहे .








