विज पडून दोन बैलांचा मृत्यु
Beed

विज पडून दोन बैलांचा मृत्यु
धानोरा/प्रतिनिधि
आष्टी तालुक्यातील पिंपळा परिसरातील धनगरवाड़ी येथे विज पडून दोन बैल ठार झाल्याची दुःखद घटना घडली. आज दि 2 रोजी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकड़ाट मध्ये पाऊस होत असताना धनगरवाडी शेतकरी विकास दगडू गावडे यांच्या घरा जवळील चिंचेच्या झाडावर वीज पडून त्या खाली बांधलेल्या दोन बैलांचा मृत्यु झाल्याची दुःखद घटना घडली आहे. आधीच कोरोनाचं थैमान त्यात निसर्गाची अवकृपा ह्या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.








