धारूर ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी तासनतास मोबाईलवर

धारूर ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी तासनतास मोबाईलवर
किल्ले धारूर/प्रतिनिधि
धारूर ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी अक्षरशा तासन्तास मोबाईलवर बोलताना दिसत आहे डोस घेण्यासाठी पूढे बालक असतानादेखील डोस देणाऱ्या नर्स या मोबाईलवर बोलत होत्या यावरून आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोणाचा धाक राहिला का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे या ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी दररोज उशिरा येत असल्याने रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे
धारुर ग्रामीण रुग्णालयाचे व्यवस्थापन सध्या ढासळले आहे
या रुग्णालयातील कर्मचार्यांवर कोणाचाही धाक राहिलेला नाही . कभी भी आओ कभी भी जाओ घर है तुम्हारा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कर्मचारी आत मध्ये आले तरी तासन्तास मोबाईलवर बोलत राहतात यामुळे रुग्ण ताटकळत बसतात याचेदेखील या कर्मचाऱ्यांना भान राहत नाही असाच प्रकार सोमवारी सकाळी साडेदहा वाजता आढळून आला प्रत्येक सोमवारी लहान बालकांना डोस दिले जातात हे डोस देण्याची जबाबदारी या रुग्णालयातील नर्स आशा मुंडे यांच्या वरती आहे सकाळी नऊ वाजता डोस देण्यास सुरू करायला हवे परंतु चक्क या नर्स साडेदहा वाजता रुग्णालयामध्ये आल्या उशिरा आल्याने लहान बालक एक ते दीड तास पासून डोस साठी ताटकळत बाहेर बसले होते आल्यानंतर त्या फोनवर चक्क खूप वेळ बोलत होत्या यामुळे उपस्थित असलेल्या मातानी आरोग्य विभागा बद्दल संताप व्यक्त केला आहे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अशा निष्काळजी कर्मचाऱ्यांवर आरोग्य विभागाने कारवाई करावी अशी मागणी माता अंजना गायसमुद्रे यांनी केली आहे








