बीड शहरात स्वच्छता मोहिमेला आ.क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूवात

Beed

बीड शहरात स्वच्छता मोहिमेला आ.क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूवात

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, बीड शहरात देखील मागच्या काही दिवसात कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असुन हीच बाब लक्षात घेता आ.संदीप क्षीरसागर यांनी स्वत:ची यंत्रणा उभारून संपुर्ण बीड शहर निर्जंतुकीकरण करून घेर्‍यास सुरूवात केली आहे. काही कारणास्तव आ.क्षीरसागर उपस्थित राहु न शकल्याने माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, दिनेश मुंदडा, आदि मान्यवरांच्या उपस्थितीत बशिरगंज भागात या स्वच्छता मोहिमेची सुरूवात केली. 

अत्याधुनिक निर्जंतुकीकरण मशिनच्या माध्यमातुन ही स्वच्छता मोहिम सुरू करण्यात आली आहे. बीड शहरातील प्रत्येक रस्ता आणि गल्ली बोळात या मशिनच्या माध्यमातुन निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. या मशिनच्या माध्यमातुन दुसर्‍या मजल्यापर्यंत निर्जंतुकीकरण करणे शक्य असणार आहे. त्याचबरोबर 100 मजुरांचा ताफा देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे, जेणेकरून कमी वेळात बीड शहरातील  जास्तीत जास्त भाग निर्जंतुकीकरण केला जाईल. काही दिवसांवरच मान्सुनचे देखील आगमन होणार असुन मान्सुनपुर्व तयारी या अत्याधुनिक मशिन आणि 100 मजुरांच्या माध्यमातुन केली जाणार आहे.

Sharing

Visitor Counter