कसबा विभागातील डांबरी रस्ता दुरुस्त करा -गटनेत्या सौ.उज्वला शिनगारे

कसबा विभागातील डांबरी रस्ता दुरुस्त करा -गटनेत्या सौ.उज्वला शिनगारे
किल्लेधारुर (प्रतिनिधी)
धारुर शहरात काही दीवसाखाली डांबरी रस्ते खराब झाले असल्याने खड्डे भुजवण्याचे काम करण्यात आले आहे माञ शहरातील कसबा विभाग येथील प्रभाग क्रमाक ८ मधील रस्ते भुजवण्यात आलेले नाहीत त्यामुळे हा भाग धारुर शहरात येतो का नाही असाही सवाल दीलेल्या निवेदनात गटनेत्या उज्वला शिनगारे यांनी उपस्थीत करत खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.
धारुर शहरात नगर परिषदेच्या वतीने ई - निविदा क्र ०४ सा.बा.विभाग २०१९-२० या निविदा सुचनेतील अ.क्र २६ नुसार शहरातील डांबरी रस्त्याचे काही ठीकाणचे काम नुकतेच करण्यात आले आहे माञ कसबा विभाग प्रभाग क्र ८ मधील विजय खामकर यांचे दुकान ते आबाराव फुन्ने यांचे घर व मारुती मंदीर विर पांडूरंग चौक ते काझी मज्जीत या डाबरी रस्त्यावरील खड्ड्याचे खड्डे भुजवण्याचे काम करण्यात आलेले नाही सदरील भाग मुख्य व रहदारीचा आहे यामुळे या रस्त्याने वागनार्या नागरीकांना या खड्ड्याचा ञास होत आहे त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी तसेच सदर काम करण्याबाबद आपले म्हनणे लेखी स्वरुपात कळवावे अशी मागणी मुख्यधिकारी यांना दीलेल्या निवेदनात गटनेत्या उज्वला शिनगारे यांनी केली आहे.








