डीवायएसपी गर्दी आवरताना धक्काबुक्की
Beed

डीवायएसपी गर्दी आवरताना धक्काबुक्की
बीड/वार्ताहर
बीड जिल्हा रूग्णालयातील आज कोरोना लसीकरणासाठी झालेली गर्दी आवरताना येथील उपअधीक्षक संतोष वाळके यांना धक्काबुक्की झाली. जिल्हा रुग्णालयात बुधवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला.
जिल्ह्यात लसींचा तुटवडा होता. मंगळवारी ५६ हजार डोस प्राप्त झाले. बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी झुंबड उडाली होती. तेथे गोंधळ होऊ लागल्याने उपअधीक्षक वाळके यांनी धाव घेतली. यावेळी सहा जणांनी त्यांना धक्काबुक्की केली. यात त्यांना गळ्यावर नखांचे ओरखडे उमटले. वाळकेंना धक्काबुक्की झाल्यावर पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. यावेळी काही जणांना लाठीचा प्रसाद दिला. सहा संशयितांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर ठाण्यात सुरू होती.








