विनाकारण फिरणाऱ्यांची केली जातेय अँटीजन टेस्ट

Beed

विनाकारण फिरणाऱ्यांची केली जातेय अँटीजन टेस्ट

किल्लेधारुर/रवि गायसमुद्रे

शहरात संचारबंदीचा काळात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बंदच्या काळात अत्यावश्यक गोष्टींना सूट देण्यात आली आहे. त्याच गोष्टींचा गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून आले.
शहरात आज अँटिजेन तपासणी करण्यात आल्या दुपारी 2:00 वाजेपर्यंत 18 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या.त्यापैकी 17 निगेटीव्ह तर 1 पॉझिटिव्ह रिपोर्ट आढळून आला आहे. 

या तपासणीमुळे अनेकांची उडाली धांदल.

दरम्यान जिल्ह्यात कोवीडचा वाढता प्रभाव आणि संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासन विविध पावले उचलत आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक शहरामध्ये प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या लोकांची तपासणी सुरू केली आहे. यामुळे अनेकांची धांदल उडाली आहे.

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी यासंदर्भात आदेश काढून कठोर अमंलबजावणीचे संकेत दिले होते. कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. 

शहरातील छ.शिवाजी महाराज चौक, तेलगाव रोड ,आडस रोड या ठिकानी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.विनाकारण बाहेर फिरनाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे प्रशासनाने विनाकारण जे बाहेर येतील त्यांची ॲन्टीजन टेस्ट आणि दंड आकारण्यासाठी पथकांची नेमणूक केली असुन या कारवाईसाठी महसूल विभाग ,नगर पालिका, आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्त सक्तीचे प्रयत्न करत आहेत.

Sharing

Visitor Counter