जिल्हाधिकारी साहेब, ग्रामीण भागात जणजागृती व लाॅकडाऊन कडक करा-प्रा.ईश्वर मुंडे

जिल्हाधिकारी साहेब, ग्रामीण भागात जणजागृती व लाॅकडाऊन कडक करा-प्रा.ईश्वर मुंडे
किल्ले धारूर/प्रतिनिधी
देशासह महाराष्ट्र व बीड जिल्हयात कोरोनाचा कहर माजला आहे.प्रशासनातील अधिकारी व पालक मंत्री महोदयांसह सर्व पदाधिकारी दिवस रात्र अतोनात प्रयत्न करत आहेत ही बाब चांगली आहे.परंतू कोरोनाला ब्रेक लागत नाही म्हणजे कांही तरी चुकत आहे.
रोग हाल्याला व इंजेक्शन पखालीला असे चित्र दिसत आहे.कोरोना पेशंट ची आकडेवारी पाहता शहरी भागातील संख्या कमी असून शहरातील लोक कोरोना नियमांचे पालन करताना दिसत आहे पण ग्रामीण भागात कोरोना नियमांची व जन जागृतीची एैशी की तैशी चालू आहे परीणामी पेशंटची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे.एकाच घरातील चार,पाच,सहा असे पेशंट वाढत आहेत परिणामी जिल्हयातील कोरोनाचे मीटर दररोज हजारी पार करत आहे.
शहरातील लाॅकडाऊन कडक करून कोरोना थांबत नाही म्हणजे ग्रामीण भागांत लाॅकडाऊन चा फास आवळणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागांत गाव गप्पा,तंबाखू-चुना,शेजार-पाझार,जाणे-येणे,गावात व घरात सोशल डिस्टंस पाळले जात नाहीत.कांही लक्षणे दिसताच तपासणी करणे व विलगीकरण हा प्रकार होत नाही.झिरो डेथ मिशन ला प्रतिसाद देत नाहीत.
या साठी ग्रामीण भागात गाव पातळींवर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या गावात निरीक्षक म्हणून नियुक्त्या करणे.पोलीसांना शहरातील चौका चौकात बसवण्यापेक्षा गावागावात चोख बंदोबस्त दयावा.गावा गावात संचारबंदी करावी.
यामुळे नक्कीच जिल्ह्यातील कोणाची चैन ब्रेक होईल व कोरोना लाट ओसरेल असे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी,ओबीसी सेल, प्रदेश सरचिटणीस प्रा.ईश्वर मुंडे यांनी जिल्हाधिकारी,बीड यांना आवाहन केले आहे.








