फातेमा शाहजे़ब शेख हीने वयाच्या पाचव्या वर्षी पहिला रोजा केला पूर्ण
Beed

फातेमा शाहजे़ब शेख हीने वयाच्या पाचव्या वर्षी पहिला रोजा केला पूर्ण
धारूर/वार्ताहर
इस्लाम धर्माचा पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होऊन आज 24 दिवस पूर्ण झाले या पवित्र महिन्यात मुस्लिम धर्मातील लहान-मोठे स्त्री-पुरुष महिनाभर रोजा (उपवास ) व पाच वेळा नमाज पठण करून जकात अदा करून अल्लाहकडे संपूर्ण जगातील मानव जातीला सुख प्राप्त होवो सर्वांची मनोकामना पूर्ण होवो सर्वांना चांगले आरोग्य लाभो अशी दुवा प्रार्थना अल्लाह कडे या लहान मुले मुली ही मागे राहत नाही ते आपल्या घरातील मोठ्यांचे अनुकरण करत रोजा उपवास करतात धारूर येथील शाहजे़ब शेख यांची मुलगी फातेमा हीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा वयाच्या पाचव्या वर्षी पूर्ण केल्याने परिवारासह नातेवाईक मित्रपरिवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.








