बीड मध्ये रुग्णांची हेळसांड; पालकमंत्री शांत का?:- राजेंद्र आमटे

बीड मध्ये रुग्णांची हेळसांड; पालकमंत्री शांत का?:- राजेंद्र आमटे
बेड उपलब्ध नाही, व्हेंटिलेटरचा तुटवडा,ऑक्सीजनसाठी रुग्णा भुईवर
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्हा रुग्णालयात आंदळ दळतय आणी कुत्र पीठ खाताय अशी अवस्था झाली आहे. अनेक रुग्णांना खाली जमिनीवर उपचार घेतले जात आहेत.एका खाटेवर दोन- दोन रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहे.काही रुग्णांना बसण्याच्या बाकावर उपचार घेत आहेत.ऑक्सीजन बेड साठी नातेवाईकांची पळापळ सुरू आहे.रेमडेसिवीर इंजेक्शन तर दूरची गोष्ट पण रुग्णांना साधा बेड भेटू नये हे दुर्दैव. ज्याच्या हातात प्रशासनाची धुरा आहे असे पालकमंत्री, जिल्हाधिकारी,आपत्ती नियोजन विभाग करतोय तरी काय?
कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी पुढे येणारे आज रुग्णांना बेड भेटत नाही जमिनीवर उपचार घेवा लागत आहे,एका गादीवर वर दोन रुग्णांना उपचार घेवा लागत आहे या पापाचे धनी कोण?सांगा जर रुग्णांना सेवा देने होत नसेल तर आपल्या जिल्ह्याचा पालक म्हणून घेण्याचा कसलाही अधिकार नाही पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आपत्ती निवारण समिती यांनी तात्काळ निर्माण घेऊन जिल्ह्यात रुग्णांना संख्या वाढू शकते याचे नियोजन करून या पुढे तरी रुग्णांना ची होणारी हेळसांड थांबवावी अन्यथा आपल्याला जवाबदारी पेलवत नाही असे समजून राजीनामा द्यावा असे पत्रक राजेंद्र आमटे यांच्या वतीने काढण्यात येत आहे








