मराठा समाज स्वतःच्या हक्काच आरक्षण मागतोय, विनाकारण अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेतलं जाईल :- शिवसंग्राम

मराठा समाज स्वतःच्या हक्काच आरक्षण मागतोय, विनाकारण अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेतलं जाईल :- शिवसंग्राम
आष्टी/प्रतिनिधी
मराठा समाज कोणा दुसऱ्याच्या हक्काचे आरक्षण न मागता स्वतःच्या हक्काचे आरक्षण मागत असुन विनाकारण अंगावर येणाऱ्यास शिंगावर घेतल्याशिवाय रहाणार नाहीत असा सणसणीत इशारा शिवसंग्रामचे आष्टी तालुका सरचिटणीस विशाल सासवडे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला आहे. पुढे म्हणाले की विधायक मार्गाने आरक्षणाची लढाई लढत असुन कोणाच्याही आरक्षणास धक्का लावुन आम्हाला आरक्षण मिळावे ही मराठा समाजाची व शिवसंग्रामची भूमिका नाही. पूर्वीचे प्रत्येक आरक्षण कायम ठेवुन मराठा समाज आरक्षण मागत आहे. उगाचच काही स्वतःला मोठे समजुन समाजात दुही निर्माण करणारे नतब्रष्ठ लोक व सोशल मीडियावर मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या वाचाळवीरांना इशारा आहे की आमच्या आरक्षणाच्या विरोधात कोणीही मीठ कालवण्याचा प्रयत्न करु नये आणि समाजा समाजा मध्ये दुही निर्माण होईल वाद निर्माण होईल अशा प्रकारची कृत्य व बिनकामाची बडबड कोणीही करु नये. हीच आमची मराठा समाज आणि शिवसंग्रामची भावना आहे. जर का विनाकारण आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न कराल तर त्या हारामखोरांना आम्ही पण शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजाने प्रत्येक वेळी प्रत्येक समाजासोबत मोठ्या भावाची भूमिका बजावली असुन आमची सततची मराठा आरक्षण मागणी करत असताना इतर समाजाप्रती वाईट भावना कधीही व्यक्त केली नाही. आणि यापुढेही कधी करणार नाहीत. परंतु स्वतःच्या अकलेचे तारे तोडणारे काही दरिद्री महाभाग मराठा समाजाला तुछय समजत असतील तर असले घाणेरडे प्रकार यापुढे मराठा समाज कधीही खपवुन घेणार नाही पुन्हा जर असले प्रकार निदर्शनास आले तर जिथल्या तिथंच त्या नीच औलादिंना धडा शिकवला जाईल असे मत शिवसंग्रामचे आष्टी तालुका सरचिटणीस विशाल सासवडे यांनी प्रसिद्धी पत्रकापुढे मांडले आहे.








