ईदसाठी पाणी पुरवठा सुरळीत करा, नसता नगर प्रशासनाला काळे फासणार-हाफेज अशफाक

ईदसाठी पाणी पुरवठा सुरळीत करा, नसता नगर प्रशासनाला काळे फासणार-हाफेज अशफाक
बीड/वार्ताहर
गेल्या दोन वर्षापुर्वी ऐन ईदच्या दिवशी रोजेदारांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली होती. तिच परिस्थिती यावर्षी होवू नये. नगर प्रशासनाने ईदच्या पुर्वीच पाण्याचे नियोजन करावे जर ईदसाठी पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर बीड नगर प्रशासनाला काळे फासणार असा ईशारा एमआयएमचे नगर सेवक हाफेज अशफाक यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
गेल्या एक महिन्यापासून बीड नगर वासींयाना पंधरा दिवसाला पाणी पुरवठा होत आहे. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. ईदच्या दिवशीही रोजेदारांना पाण्यासाठी हंडा घेवून भंटकंती करण्याची वेळ येवू नये म्हणून नगर प्रशासनाच्या पाण्याच्या टाकीवरील कर्मचार्यांना वारंवार पाठपूरावा करुनही जर ईदच्या दिवशी नगर पालिकेच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे नगर वासियांना पाण्याचा त्रास झाला तर नगर प्रशासनाच्या संबधीत अधिकार्यांना काळे फासणार असा स्पष्ट ईशारा एमआयएमचे नगरसेवक हाफेज अशफाक यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
या पत्रकात असे नमुद केले आहे की, गेल्या दोन वर्षापुर्वी पाण्याच्या टाकीवर अनुभवी ऑपरेटर नसल्याने नागरीकांना ईदच्या दिवशी पाण्याचा त्रास सहन करावा लागला होता. यंदाही पुर्वीचे जुने ऑपरेटर दुधाळ यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर आलेले ऑपरेटर यांना बीड शहराचा पाणी सोडण्याचा अनुभव कमी आहे. कमी अनुभवाचा फटका नागरीकांना बसू नये म्हणून नगर पालिका प्रशासनाने ईदच्या पहिलेच पाण्याचे नियोजन करावे जेणे करुन नागरीकांना गेल्या दोन वर्षापुर्वी झाल्यासारखा त्रास होवू नये याची नगर प्रशासनाने विशेष दखल घ्यावी नसता काळे फासल्याचे सामोरे जावे लागेल.








