बीडमध्ये आवळली मराठा क्रांती मोर्चाने वज्रमुठ मराठा आरक्षणासाठी आता मूक नव्हे तर ठोक मोर्चा बीडमध्ये पुन्हा मराठा बांधव एकवटला

Beed

बीडमध्ये आवळली मराठा क्रांती मोर्चाने वज्रमुठ मराठा आरक्षणासाठी आता मूक नव्हे तर  ठोक मोर्चा बीडमध्ये पुन्हा मराठा बांधव एकवटला, आरक्षणासाठी आता आरपारची लढाई लढणार

बीड/प्रतिनिधी

मराठा आरक्षण सुप्रिम   कोर्टात रद्द करण्यात आल्याबद्दल तिव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. आतापर्यंत समाजाणे 58 शांतते मूक मोर्चे व 42 बांधवांचे बलिदान दिले तरीही सरकारला आणि न्यायालयाला याची दखल घ्यावीशी वाटली नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी मूक नव्हे तर आक्रमक पणे ठोक मार्चे काढण्याचा निर्णय मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये शनिवारी (दि. 08 मे) रोजी  पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. आरक्षणासाठी मराठा समाजाने बीडमध्ये वज्रमुठ आवळल्याचे दिसून येत आहे. या बैठकीला विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.
 मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहे, यामुळे प्रत्येक मराठा बांधवाला हा मोठा धक्का बसला आहे.  मराठा समाजातील सर्वचजण श्रीमंत नाहीत. मोलमजुरी करणे, मुंबईत माथाडी काम करणे, अशी कामे ते करत आहेत. त्याना स्वत:चे घर नाही. म्हणून ते मिळेल त्या झोपडीत राहतात.  मराठा समाजातील अनेक कुटुंबांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मराठा समाजाचा राज्यकर्ते केवळ मतासाठी वापर करत आहेत, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारणे हात न झटकता राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी असून त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आता आरक्षणासाठी मराठा समाज आरपारची लढाई लढणार आहे. यासाठी बीडमध्ये समाज बांधवाचीं बैठक पार पडली. यावेळी आरक्षण लढ्याची पुढील दिशा ठरवण्यात आली. या बैठकीला प्रा सचिन उबाळे, गंगाधर काळकुटे, किशोर पिंगळे, ऍड महेश धांडे, शैलेश जाधव, गणेश बजगुडे, विजय लव्हाळे, ऍड शशिकांत सावंत, भाऊसाहेब डावकर, संदिप उबाळे, संतोष जाधव, युवराज मस्के, विठ्ठल बहिर, बालाजी पवार, आंकुश देखमुख, नितिन डिसले, गणेश माने, किशोर गिराम यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter