आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते खडकत येथे कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न

आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते खडकत येथे कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न
बीड (रिपोर्टर-गोरख मोरे )
आष्टी तालुक्यातील खडकत येथे आज दिनांक १० मे सोमवार रोजी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न झाले . हे कोवीड सेंटर महाराष्ट्र शासन , आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ, नामदार जितेंद्र आव्हाड युवा मंच बीड, खडक ईश्वर सेवाभावी संस्था खडकत, ग्रामपंचायत कार्यालय आणि लोकसहभागातून चालवले जाणार आहे .
या कोविड सेंटरचे उद्घाटन प्रसंगी डॉक्टर शिवाजी राऊत, काकासाहेब शिंदे, गरगटे मेजर, वाळके सुनील, भाऊ खेडकर, सरपंच राम उदमले, माजी सरपंच मुस्तफा कुरेशी, सतीश शोले, अतुल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, राजू कुरेशी, संजू आप्पा निर्मळ, तात्या जेवे, विलास फुले, सतीश जीवे, आदी मान्यवर उपस्थित होते .
तसेच आबा पवार, भीमराव भालेराव, मच्छिंद्र भालेराव, अशोक कसबे, बबन कसबे, मुख्याध्यापक तात्यासाहेब जेवे , आरिफ भाई तांबोळी, इनुस मामा आधी खडकत परिसरातील सर्व स्तरातील ग्रामस्थ, युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .








