शेतकरी,व्यापारी,नागरिकांच्या प्रश्नी आ.संदीप भैय्यांनी मांडली ग्राउंड रिऍलिटी !

शेतकरी,व्यापारी,नागरिकांच्या प्रश्नी आ.संदीप भैय्यांनी मांडली ग्राउंड रिऍलिटी !
*करोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शंभर टक्के ग्रीन झोनसाठी आढावा बैठक*
बीड मतदारसंघात घाटावर शेतकऱ्यांना मिळणार बांधावर डिझेल
बीड,प्रतिनिधी
*जिल्हा प्रशासनाने काही नियम शिथिल केल्या नंतर शहरात व ग्रामीण भागात व्यापारी,शेतकरी वर्गात संभ्रम आहे,ऑनलाईन पास काढण्यासाठी अडचणी येत आहेत, त्यांचे प्रश्न समजून घेत त्यांना वेळ वाढून देण्यात यावा, सोशल डीस्टन्स ठेऊन दहा लोकांतविवाहस परवानगी देण्यात यावी आशी मागणी करत आ. संदीप भैया क्षीरसागर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शंभर टक्के ग्रीन झोन या आढावा बैठककिती शेतकरी,व्यापारी नागरीक यांचे प्रश्न उपस्थिती करत ग्राऊंड रिऍलिटी मांडली.या बैठकीत शेतकऱ्यांना बांधावर डिझेल देण्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे, याची सुरुवात बीड मतदारसंघातील चौसाळा येथून करण्यात आली आहे.*
*जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली करोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली, या वेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर ,जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोदार,जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ अशोक थोरात,विविध विभागांचे अधिकारी यांची उपस्थितीती होती.या बैठकीत कोरोनाच्या आपत्तिकाळात काही नागरी समस्या, तसेच अत्यावश्यक सेवा व भाजी पाला पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना बांधावर डिझेल द्यावे, कापूस खरेदी केंद्रांवरील समस्या, विवाह सोहळ्यांना परवानगी देण्याबाबत, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दुकानदारांना थोडा अधिक वेळ वाढवुन देण्याबाबत,अत्यावश्यक व बाहेर जिल्हातजाण्यासाठी लागणाऱ्या ऑनलाईन पास बाबत येणाऱ्या तसेच बीड मतदारसंघासाठी अत्यावश्यक बाबींबद्दल बैठकीत आ. संदीप भैय्या यांनी भूमिका मांडली यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व मागण्यांबद्दल सकारात्मक भूमिका व्यक्त केली.बीड विधानसभा मतदारसंघातील चौसाळा येथे बांधावर असलेल्या शेतकऱ्यांना डिझेल देऊन भाजीपाला व इतर अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या शेतकऱ्यांचा डिझेल चा प्रश्न सुटण्यास सुरुवात झाली.बीड जिल्हा १००% ग्रीन झोन करण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले तातडीने उचलण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांनी यावेळी प्रशासनास दिल्या आहेत.*
*नगर परिषदेकडून व्यापारी, शेतकरी यांना त्रास होत कामा नये*
बीड शहरात शेतकऱ्यांचा भाजी पाला फेकून देणे,व्यापारी बांधव यांची अडवणूक होणे आशा तक्रारी येऊ लागल्याने हा प्रश्न आ. संदीप क्षीरसागर यांनी बैठक कित उपस्थिती केला,शेतकरी, व्यापारी बांधव यांना विनाकारण त्रास होता कामा नये आशा सूचना देण्यात आल्या आहेत.








