अंतरवाली येथील उपसरपंच किरण वावरेंनी स्वखर्चाने केली क्वारंटाईन झालेल्या 110 लोकांची व्यवस्था

अंतरवाली येथील उपसरपंच किरण वावरेंनी स्वखर्चाने केली क्वारंटाईन झालेल्या 110 लोकांची व्यवस्था
गेवराई/प्रतिनिधी
तलवाडा : आज भारत देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाहाकार माजलेला दिसत आहे. बाहेरगावाहून आलेल्या गोर गरीब उसतोड, तसेच वेगवेगळ्या कुटुंबाला त्यांनी क्वारंटाईन केलेल्या त्यांना एक मदतीचा हात म्हणून गेवराई तालुक्यातील अंतरवाली (वावरे) येथील उपसरपंच किरण वावरे यांनी स्वखर्चाने आपल्या शेतात वीज, पाणी, भाजीपाला, किराणा साहित्य अत्यावश्यक वस्तू देऊन आज एक मदतीचा हात म्हणून त्यांनी हातभार लावलेला चित्र पाहायला मिळत आहे. पुणे ,औरंगाबाद ,सातारा, पिंपरी चिंचवड, अंबड येथील नागरिक व उसतोड कामगारांना स्वखर्चातून किरण पंडितराव वावरे (उपसरपंच आंतरवाली) यांनी राहण्याची , पाण्याची, सर्व जीवनावश्यक किराणा साहित्य वाटप करण्यात येत आहे. त्यांचे देखरेखीसाठी तीन कर्मचारी निवड केली निंबाळकर एकनाथ, तुपे अविनाश, दिलीप इंदलकर व
गावातील लोकांना मार्गदर्शन व समजून सांगण्यासाठी कोरणा प्रतिबंधक समिती स्थापन केली आहे. या समितीमधील अजिंक्य वावरे,योगेश वावरे, प्रल्हाद भारती, बबन पाटील वावरे, कृष्णा बापू वावरे, सिद्धू भाऊ वावरे, हसनभाई पठाण, सुदर्शन आडगळे, जाधव अभिजीत इत्यादी त्या समितीमुळे लोकडाऊन वावरेची आंतरवाली येथील गावामध्ये शिस्तबद्ध आहे. याला म्हणतात माणुसकी जपणारे एक मोठ्या मनाचे व्यक्तीमत्व. समाजात आपण जीवन जगत असताना काहीतरी चांगले काम करणे आवश्यक असते. ते काम किरण वावरे यांचे उदाहरण आज उपसरपंच किरण वावरे, त्यांचे सहकारी मित्र सरपंच दीपक उमप सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब शिवदास राठोड यांनी दाखवून दिले आहे. याबद्दल पंचक्रोशीतील जनता त्यांचे आभार मानत आहेत.
आमचे गावचे सरपंच किरण वावरे यांनी 110 लोकांची आपल्या स्वतःच्या शेतात व्यवस्था केली आज आम्हाला मदतीला धावून आल्यामुळे त्यांचे आभार मानणे तेवढे कमीच आहे पाणी, किराणा, भाजीपाला, अत्यावश्यक वस्तू आम्हाला त्यांनी स्वतः आणून दिलेले आहे रोज आमची विचारपूस शेतात येऊन करतात समाजकार्य करणारे या जगात कमी् लोक आहे अशा
अडचणीच्या परिस्थितीत त्यांनी आम्हाला एक मदतीचा हात म्हणून दिलेला आहे आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत अशी प्रतिक्रिया सुदाम साहेबराव पंडित यांनी दिली आहे
आज पर्यंत 110 लोकांची व्यवस्था मी माझ्या शेतात केलेली आहे यापुढेही येणाऱ्या लोकांची व्यवस्था करणार आहोत अंदाजे 270 पर्यंत जाण्याची शक्यता आहे आज समाजाला धीर देण्याची गरज आहे त्यामुळे मी फुल नाही*
*फुलाची पाकळी देऊन मदत म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून करत आहोत अशी माहिती अंतरवली चे उपसरपंच किरण वावरे यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलतानी सांगितले आहे








