बीड नगर परिषदेचा भोंगळ कारभार! वारंवार तक्रार असुन देखील जिल्हा अधिकारी गप्प का?

बीड नगर परिषदेचा भोंगळ कारभार!
वारंवार तक्रार असुन देखील जिल्हा अधिकारी गप्प का?
बीड/प्रतिनिधी
आज बीड शहरात शासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार, शिथिलतेच्या वेळेत भाजीपाला व फळविक्री साठी रस्त्यावर आलेल्या विक्रेत्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता, विनाकारण बीड नगर परिषद प्रशासनाने त्यांचा भाजीपाला, फळ, हातगाड्यांवर जप्ती आणली. या कारवाई मुळे हतबल झालेल्या विक्रेत्यांचा अक्षरशः रडू आले.
हातावर पोट असणाऱ्या सामान्य विक्रेत्यांना त्रास देणे हे अतिशय वेदनादायी आहे. बीड नगर परिषद प्रशासनाच्या आजच्या अडमुठ्या भूमिकेचा निषेध होताना सगळी कळे दिसत आहे.
नगर परिषदेची या लाॅकडाउन मध्ये वारंवार तक्रार असुन देखील जिल्हा अधिकारी या कडे का दुर्लक्ष करता ? असा सवाल उपस्थित लोकांना होत आहे. फळ विक्रेते हे माणसंच आहेत कदाचित हे नगर परिषद विसरून गेली असा याठिकाणी दिसत आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार संदिप क्षीरसागर यांनी विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व तसेच तातडीने बीड नगर परिषद कार्यालयात भेट देऊन उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी त्यांना नियमात राहून व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याला यापुढे त्रास देण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा देखील संदिप क्षीरसागर यांनी दिला तसेच जे लोक नियमाच्या विरोधात जाऊन रस्त्यावर येऊन व्यवसाय करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी सूचना देखील दिली.








