औरंगाबाद शहरात भीतिचे वातावरण, नागरिकांच्या मनात धास्ति रोज पडताय कोरोना ने बळी मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह

Beed

औरंगाबाद शहरात भीतिचे वातावरण, नागरिकांच्या मनात धास्ति रोज पडताय कोरोना ने बळी मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह

धक्कादायक! औरंगाबादेत कोरोनाचे आणखी दोन बळी,  मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह
या दोन मृत्यूमुळे शहराकोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता १७ वर

*औरंगाबाद/सिद्धांत कांबळे* : औरंगाबादेत कोरोनाचे आणखी दोन बळी गेल्याची शहरातील धक्कादायक माहिती समोर आली. घाटी रुग्णालयात एका ९४ वर्षीय वृद्धेचा आणि ५६ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.या दोन मृत्यूमुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे.बीड बायपास परिसरातील अरुणोदय कॉलनी येथील ९४ वर्षीय वृद्धेला मंगळवारी दुपारी ४.४५ वाजता घाटीत दाखल करण्यात आले होते. त्यांना भरती करण्यात आले तेव्हा त्या बेशुद्ध होत्या. दुपारी ५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्याचा कोरोनाचा अहवाल रात्री ८ वाजता पॉझिटिव्ह आला.
तर हुसेन कॉलनी येथील ५६ वर्षीय महिलेला मंगळवारी सकाळी १०.१७ वाजता घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दुपारी १२.२० वाजता मृत्यू झाला. त्यांची अहवाल रात्री ८ वाजता पॉझिटिव्ह नागरिकांच्या मनात एक प्रश आणखी किती पडताय बळी शहरातील नागरिक भीतिचे वातावरण

Sharing

Visitor Counter