आ.सुरेश धस यांच्या मागणीला यश जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी शिथिलतेची वेळ वाढवून दिली.

आ.सुरेश धस यांच्या मागणीला यश
जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी शिथिलतेची वेळ वाढवून दिली.
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्या जिल्ह्यात एकवीस दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही तर तो जिल्हा रेड झोन मध्ये असला तर आॅरेज झोन आणि आॅरेज झोन मध्ये असला तस ग्रीन झोन मध्ये येतो.तर बीड जिह्यात मागील महिन्याभरात एकही रुग्ण आढळला नाही,त्यामुळे आपला जिल्हा केंद्र सरकारच्या नियमानुसार ग्रीन झोन मध्ये असूनही जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी एकदिवसाआड फक्त अडीच तास ठेवली आहे.परिणामी आता लोकांना वेळ वाढवून मिळत नसल्याने लोकं रस्त्यांवर उतरतील या परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन बीड जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी शिथीलतेची वेळ वाढविण्याची मागणी आ.सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी केल्यानंतर जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन संचारबंदी शिथिल वेळ वाढवून देत बुधवारी नवीन आदेश जाहिर केला.त्यामुळे आष्टी तालुक्यातील व्यापा-यांनी आ.धस यांच्यासह जिल्हाधिकारी रेखावार यांचे आभार मानले आहेत.








