तारांचा जांगड गुत्ता,जीव झाला खलबत्ता! गलथान कारभार कुणाचा? नगरसेवक कि विद्युत कर्मचारी?

Beed

तारांचा जांगड गुत्ता,जीव झाला खलबत्ता !
गलथान कारभार कुणाचा ? नगरसेवक कि विद्युत कर्मचारी ?

(बीड प्रसार न्युज)

वार्ड क्रमांक २० मोहम्मदीया कॉलनी बीड याठिकाणी लोकांच्या जीवनाशी खेळताना विद्युत कर्मचारी व नगर सेवक ? 

कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आज प्रशासन आपली चांगलीच भूमिका पार पाडताना दिसत आहे तर दुसरीकडे काही कर्मचारी थुक्याला थुकं लावण्याचा काम करत आहे.  

मोहमदिया काॅलनी भागातील  मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे याकडे ना नगर सेवकाचा लक्ष जात आहे नाही विद्युत कर्मचार्यांचा जर काही दुर्घटना झाली तर याचा जिम्मेदार कोन असेल नगर सेवक कि,विद्युत कर्मचारी? असा प्रश्न लोकांना निर्माण होताना दिसत आहे. 

याठिकाणी तारेचा गॅप एवडा कमी आहे कि थोडा जरी वारा आला कि  तारेला तार  चिटकते व शाॅट सर्किट्स होतो.लाईट जाते वारंवार हे प्राॅबलेम असुन या कडे कुनिच लक्ष देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याठिकाणी तारेच्या खाली  लहान लहान मुलं खेळत आहे जर तारेला तार चिटकुन शाॅट सर्किट्स होऊन एखादी दुर्घटना झाली तर याचा जिम्मेदार कोन असेल.

या भागाचे नगरसेवक फक्त नावालाच का?
मोहंम्मदीया काॅलनीचा प्रश्न वारंवार वाढत चाललेला दिसत आहे तरी याकडे नगरसेवक दुर्लक्ष करताना दिसत आहे  कारण नगर सेवकांना हे तारेचा जांगड गुत्ता दिसत नाही का? एखादी दुर्घटना झाल्यवर दिसेल का? काही भागात LED बल्प आहे तर काही भागात किरर्र अंधार आहे मग नगर सेवक LED बल्प देखील बसुन घेऊ शकत नाही का? अशे प्रशन नागरीकाकडुन बोलताना दिसत आहेत.

 

Sharing

Visitor Counter