कोरोनो पार्श्वभूमीवर औरंगाबादेत २० मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर

Beed

कोरोनो पार्श्वभूमीवर औरंगाबादेत २० मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर

 कंन्टेनमेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त विभागीय आयुक्तांनी केलेले आवाहन

औरंगाबाद/ सिद्धांत कांबळे

कोरोनो पार्श्वभूमीवर औरंगाबादेत २० मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर, कंन्टेनमेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त ठेवा – विभागीय आयुक्त औरंगाबाद  
महाराष्ट्र औरंगाबादेत २० मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर, कंन्टेनमेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त ठेवा – विभागीय आयुक्त, 20 मे पर्यंत शहरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे प्रशासनाला निर्देश
 औरंगाबाद, दि. 16 :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद शहरामध्ये बुधवार, 20 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यावेळी दिले. शहरात पोलिस प्रशासनाकडून कंन्टेनमेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कंन्टेनमेंट झोनमधून नागरिकांचे बाहेरील भागात तसेच बाहेरील भागातील नागरिकांचे कंन्टेनमेंट झोनमध्ये होणारी आवागमन बुधवार पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कंन्टेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देत नागरिकांनीही सहकार्य करून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.

Sharing

Visitor Counter