तळीरामांसाठी खुशखबर दारू घरपोच मिळणार आता दारू मिळणार ऑनलाईन तेही घरपोच

तळीरामांसाठी खुशखबर दारू घरपोच मिळणार
आता दारू मिळणार ऑनलाईन तेही घरपोच
जालना/प्रतिनिधी
आमच्या गेल्या पन्नास दिवसांच्या कालावधीत दारूची तलफ असणाऱ्यांना दारू विक्री दुकाने बंद असल्याने मोठ्या मनस्ताप सहन करावा. लागला मात्र आता जालना जिल्ह्यातील तळीरामांसाठी मोठी खुशखबर जाहीर झाली असून ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर आता थेट घरपोच दारू मिळणार आहे. असे असले ले तरी त्यांच्याकडे मद्य शौकिनांसाठी आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ऑनलाईन नोंदणी करून त्यांना डिलिव्हरी बॉय च्या माध्यमातून घरपोच मद्य पुरवठा येणार आहे तसे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाने जारी केले आहे. असे असलेले तरी, ज्यांच्याकडे मद्य पिण्याचा परवाना आहे अशांनाच या घरपोच योजनेचा लाभ होणार आहे. करण्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच 21 दिवस लॉकडाऊन जाहीर झाले त्यानंतर दुसऱ्यांदा 19 दिवस व तिसऱ्यांदा 14 दिवसाचे लॉकडाऊन झाले त्यामुळे गेल्या 50 दिवसांपासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनमध्ये अन्य व्यवसायाप्रमाणे मद्य विक्रीदेखील बंद झाली यामुळे तळीरामांना मोठा मनस्ताप झाला अव्वाच्या सव्वा पैसे मोजून घशाची कोरड भागविण्यासाठी अनेकांना भागम भाग करावे लागली. राज्यात इतरत्र दारूची दुकाने सुरू झाल्यानंतरही आपल्या जालना जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी दारूच्या दुकाने उघडण्यास परवानगी दिली नाही यामुळे तळीरामांचा मोठा हिरमोड झाला. मात्र आता ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर घरपोच दारू मिळणार असल्याने तळीरामांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. ही योजना फक्त मध्य पिण्याचा परवाना असणाऱ्यांसाठी असल्याने अनेकजण परवाना काढण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. तुला जिल्ह्यातील जालना शहरात चार तर मंठा व अंबड शहरात प्रत्येकी एक अशा सहा वाइन शॉप असून या शॉप मार्फत तळीरामांचा साठी घरपोच दारू मिळणार आहे. विशेष म्हणजे या दुकानावर गेल्यावर ग्राहकांना दारू मिळणार नाही. दारुसाठी ऑनलाईनच नोंदणी करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.सदर ऑनलाइन व्यवस्था सुरळीत चालू आहे की यासाठी लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सूचनाही करण्यात आल्या आहे.








