नाळवंडी नाका भागात विजेचा लपंडाव

Beed

नाळवंडी नाका भागात विजेचा लपंडाव

बीड/प्रतिनिधी
लॉकडाउन सुरू असलेल्या लोक घरात आहेत त्यात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नाळवंडी नाका भागातील गजानन नगर भागातील नागरिक महावितरण कंपनीच्या कारभारास वैतागले असून, एकदा विज गेली की, कधी येईल याचा काही नेम राहीला नसून अलितरी कितीवेळ टिकेल याची खात्री नाही. येथील विज पुरवठा सुरूळित करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.

सध्या मे महिना असल्याने सुर्य आग ओकत असल्याने मोठी उष्णता निर्माण झाली असल्याने माणसाच्या जिवाची लाहीलाही होत आहे. त्यात कोरोना विषाणू संसर्ग आजारामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने घरात थांबावे लागत आहे. विज गेली की, माणूस उकडून निघत आहे. यावेळी गजानन नगर भागातील विज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रात्री बे रात्री कधी ही विज जात असून ते थेट सकाळीच येत आहे,तर दिवसभरही सतत ये जा सुरू असून या लपंडावामुळे विजेची उपकरणे जळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वरीष्ठ आधिकार्‍यांनी याकडे गांभीर्य पुर्वक लक्ष देऊन याभागातील विज पुरवठा सुरूळित करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Sharing

Visitor Counter