अंभोरा पोलीस कोरोनाविरुद्ध लढताहेत खिंड; दोन कर्मचाऱ्यांना दिले प्रामाणिकपणाबद्दल रोख बक्षीस

अंभोरा पोलीस कोरोनाविरुद्ध लढताहेत खिंड; दोन कर्मचाऱ्यांना दिले प्रामाणिकपणाबद्दल रोख बक्षीस
आष्टी/प्रतिनिधी,
बीड प्रसार न्युज.
महाराष्ट्र राज्य मार्ग क्रमांक १४२ हा राष्ट्रीय राज्यमार्ग असून अहमदनगर, नाशिक, पुणे, मुंबई ते नांदेड ,परभणी, सोलापूर यामार्गे पर राज्यांना जोडणारा रस्ता असल्याने वाहतुकीचे प्रमाणही मोठे आहे.
अंभोरा चेक पोस्ट हे तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्र सेनगावकर यांनी निर्माण केले आणि या ठिकाणी चेकिंग होत असल्याने गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे.
कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगाने महाराष्ट्रभर थैमान घातले असताना आणि अहमदनगर पुणे-नाशिक या जिल्ह्यांमध्ये हॉटस्पॉट झाले असल्याने राज्य मार्ग क्र१४२ वर दौलावडगाव या दोन चेक पोस्टवर मुळे बीड,उस्मानाबाद हे जिल्हे ग्रीन झोन मध्ये राहिले.त्यामध्ये अंभोरा चेक पोष्टचा मोठा वाटा आहे.
आष्टी आणि अंभोरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह होमगार्ड,शिक्षक आणि डॉक्टरांना याठिकाणी चेकिंग कामी नेमले आहे. याठिकाणी अनेक वेळा कर्मचाऱ्यावर वाहने सोडण्याबाबत कठोर भूमिका घेण्याची वेळ आली असताना ती त्यांनी कठोरपणे पार पाडली आहे. काही वेळा आमिष दाखवण्यात आली तरी पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख कामगिरी केली आहे.
बीड पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अतिरिक्त अधीक्षक विजय कबाडे यांनी ही या कर्मचाऱ्यांची परीक्षा घेतली. दि. १५ मे रोजी दौलावडगाव आणि आंभोरा या ठिकाणी डमी प्रवासी पाठवून अहमदनगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करून देण्यासाठी आर्थिक आमिष दाखवले परंतु प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून हे डमी प्रवासी परत पाठवल्या बदल पोलीस अधीक्षकांनी पोलीस हेडकॉन्सटेबल सोपान येवले (ब.क्र.७८०) आणि पोलीस हेड कॉन्सटेबल विलास माली (१२३०) यांना ५ हजार रुपये रोख आणि जीएसटी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
उपअधीक्षक विजय लगारे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांचे मार्गदर्शनामुळे आम्ही हे ही कामगिरी केली असल्याचे कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले.








