आखेर त्या कोरोनाग्रस्त महिलेचा अंत्यसंस्कार भगवान बाबा प्रतिष्ठानच्या शमशानभूमितच!

आखेर त्या कोरोनाग्रस्त महिलेचा अंत्यसंस्कार भगवान बाबा प्रतिष्ठानच्या शमशानभूमितच!
बीड/प्रतिनिधी
काल सात करोना रुग्ण आढळून आल्यानंतर आज सकाळी त्या सात रुग्णांपैकी एक महिलाचा मृत्यू झाल आज त्या कोरोनाग्रस्त महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास बीड येथील संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या समशान भूमीत केलं.परंतु जवळच्या राहणाऱ्या असताना स्थानिकांनी विरोध दर्शविला होता मात्र पोलिसांनी त्या विरोधकांना समजून सांगून त्या महिलेचा अंत्यसंस्कार भगवानबाबा प्रतिष्ठान या ठिकाणीच केला.
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह घेऊन समशान भूमीत नेऊन आला तिथे स्थानिक रहिवाशी नागरिकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी विरोध केला होता नागरिकांनी विरोध करताना सांगितले की आमची घरी तिथून जवळ असून आमच्या घराकडे धूर आणि वास येतो त्यामुळे आम्ही अंत्यसंस्कार होऊ देणार नाही अशी भूमिका नागरिकांनी त्या ठिकाणी स्पष्ट केली होती परंतु अशी माहिती भेटतात घटनास्थळी शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला हजर झाले व स्थानिक नागरिकांची त्यांनी समजूत घातली व अंत्यसंस्कार येथेच होणार आहे अशी माहिती बीड प्रसार शी बोलताना निरिक्षक यांनी दिली.








