तालुक्यात बाहेरुन आलेल्या व्यक्तीचीं माहिती लपविणा-यांवर होणार कारवाई - तहसिलदार निलीमा थेऊरकर

Ashti

तालुक्यात बाहेरुन आलेल्या व्यक्तीचीं माहिती लपविणा-यांवर होणार कारवाई - तहसिलदार निलीमा थेऊरकर

आष्टी/प्रतिनिधी,
बीड प्रसार न्युज.

गेल्या दोन महिन्यापासून आपण कोरोना या विषाणू रोगाला दूर ठेवले असून, ह्या यशामध्ये नागरिकांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु सध्या शासनाच्या परवानगीने लोकं आप-आपल्या गावात येत आहेत. तसेच काही लोक छुप्या मार्गाने सुध्दा येत आहेत. ज्या गावामध्ये बाहेरगावावरुन, परराज्यातून नागरिक आल्यास तात्काळ गावातील ग्रामपंचायतला किंवा आशा वर्कर यांना कळवावे. जर कोणी अशा लोकांची माहिती लपवून ठेवली तर त्यांच्यावर कोठर कारवाई करण्याचा ईशारा तहसिलदार निलीमा थेऊरकर यांनी दिला आहे.
             

याबाबत अधिक बोलतांना त्या पुढे म्हणाल्या तालुक्यात ७ एप्रिलला पहिला रुग्ण नगर येथून पळून येवून आपल्या गावी म्हणजे पिंपळ्यात सापडला. सुदैवाने तो बराही झाला. परंतु काल परवा नगर जिल्ह्यातलेच आपल्या सासरवाडी असलेल्या सांगवी पाटण मध्ये सात जण मुंबईवरून आले. त्यांना त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल केले असता ते सातही जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यातील नागरिकांनी घाबरुन न जाता सुरक्षेतेची काळजी घेऊन सतर्क रहावे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी म्हणून गावात बाहेरून आलेल्या नागिकांची माहिती प्रशासनाला कळवावी किंवा गावात ग्रामपंचायत,पोलिस पाटील, तलाठी, मंडळधिकारी, आशा वर्कर यांच्यापैकी कुणालाही कळवावी याउपरही जर संबंधित व्यक्तींची माहिती लपविल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही तहसिलदार थेऊरकर यांनी दिला आहे.

Sharing

Visitor Counter