स्वराज नगर सरस्वती शाळा जुना धानोरा रोड पंचशील नगर या भागातील नागरिकांनी आम आदमी पार्टीच्या संवाद यात्रेत व्यथा मांडल्या

Beed

स्वराज नगर सरस्वती शाळा जुना धानोरा रोड पंचशील नगर या भागातील नागरिकांनी आम आदमी पार्टीच्या संवाद यात्रेत व्यथा मांडल्या                

आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात एक प्रतिनिधी मंडळ नगरपालिका प्रशासनाला भेटणार  अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

बीड/वार्ताहर 

बीड शहरामध्ये पाठीमागील दोन वर्षापासून आम आदमी पार्टी बीड शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न मांडण्याचे काम करत आहे याच ंवाद दौर्‍यामध्ये आम आदमी पार्टीने  स्वराज्य नगर पंचशील नगर सरस्वती शाळा जुना धानोरा रोड या भागामधील नागरिकांशी संवाद केला व येथील नागरिकांनी या भागात होत असलेल्या त्रासाबद्दल व्यथा मांडल्या या भागामध्ये नगरपालिकेने कित्येकदा आश्वासने देऊन देखील रस्ते नाल्या मोकाट जनावरे व स्वच्छतेच्या नामावर कधीतरी एखादी घंटागाडी फिरताना दिसते परंतु सर्व नाल्या ब्लॉक पडलेले आहेत मोकळ्या जागेमध्ये सर्व गटारे भरून नगरपालिकेच्या कृपेने या हिवाळ्याच्या दिवसात देखील पाऊस नसताना तळ्याचे स्वरूप आलेले दिसत आहे त्यामध्ये घाणीचे साम्राज्य मच्छर मोकाट जनावर यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत वारंवार या तक्रारी नगरपालिकेला देऊन देखील तेथील जनप्रतिनिधी नागरिकांच्या व्यथा ऐकण्यासाठी तयार नाहीत नागरिक उदास आहेत ते सांगतात की फक्त आणि फक्त इलेक्शनच्या तोंडावर आमच्याकडे मतदान मागायला येतात आणि काम झाल्यानंतर तोंडही दाखवत नाहीत या नागरिकांनी आम आदमी पार्टीवर विश्वास करून एक प्रतिनिधी मंडळ या विषयाला घेऊन लवकरच नगरपालिका प्रशासनाला भेटणार आहे लेखी निवेदन देऊन जर काम नाही झाले स्वच्छता झाली नाही तर आम आदमी पार्टी या नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन उभे करणार या मोहिमेमध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, शहर प्रमुख सय्यद सादेक, जिल्हा सचिव रामधन जमाले, रामभाऊ शेरकर, प्रा. ज्ञानेश्वर राऊत संघटक, संतोष शिंदे, अक्रम शेख उपजिल्हाध्यक्ष, इत्यादी उपस्थित होते

Sharing

Visitor Counter