माजलगाव तेलगाव रोडवरून तेलगाव कडे जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे जागीच ठार

माजलगाव तेलगाव रोडवरून तेलगाव कडे जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे जागीच ठार
माजलगाव/प्रतिनिधी
माजलगाव तेलगाव रोडवरून तेलगाव कडून माजलगाव ला मोटारसायकल वरून येणाऱ्या मोटारसायकल ला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकल वरील दोघेही जागीच ठार झाल्याची घटना दि. २० जानेवारी रोज रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास लाहामेवाडी पाटी समोर घडली आहे.
या बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की माजलगाव तेलगाव रोडवरून तेलगाव कडून मोटारसायकल क्रमांक एम एच ४४ डब्ल्यू ९६६८ वरून राजेंद्र सिंह बन्सीलाल राजपुरे वय २६ वर्षे रा. राजेस्थान मधील चाकरण मनिषकुमार सोनी वय २२ वर्षे रा. राजेस्थान काडवा हे येत असताना अज्ञात वाहने धडक देवुन उडवले या अपघातात हे दोघेही जागीच ठार झाले ही घटना दि. २० जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस ए पी आय जजवाळ, सहयक पो उपनिरीक्षक सुनिल आईटवार यांनी घटनास्थळी जावून मयत दोघांना ही ग्रामीण रूग्णालयात आनले असुन पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.








