जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कडुनिंबाच्या झाडाला काटेरी तारेचे कुंपण न केल्यास झाडावर चढुन आंदोलन करणार

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कडुनिंबाच्या झाडाला काटेरी तारेचे कुंपण न केल्यास झाडावर चढुन आंदोलन करणार
बीड/वार्ताहर
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला आठवडाभरात कावेरी तारेचे कुंपण (कंसेंटीना)जिल्हाप्रशासनाने न केल्यास दि.७ फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्तेच झाडावर चढुन आंदोलन करतील अशा ईशारा जिल्हाप्रशासनाला दिला आहे
सविस्तर माहीतीस्तव -बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी कडुनिंबाच्या झाडाचा वापर शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्याचे प्रकार वारंवार घडत असुन महिला सुद्धा झाडावर चढुन आंदोलन करत आहेत, अशाप्रकारे आंदोलनकर्त्यांना जिवितहानी किंवा गंभीर दुखापत होऊ शकते तसेच सदर परीसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, आंदोलनकर्ते यांना झाडावरून खाली उतरवण्यास पोलीस प्रशासनाची दमछाक होते त्यामुळे भविष्यात असे आंदोलन टाळता यावे यासाठी काटेरी तारेचे कुंपण करण्याची आवश्यकता आहे.
ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात ४ वेळा महिलांचे झाडावर चढुन आंदोलन
महिलांनी झाडावर चढुन आंदोलन करण्याचे प्रमाण वाढले असुन दि.५ ऑक्टोबर रोजी तारामती साळुंके तर ८ नोव्हेंबर व २६ डिसेंबर रोजी अनिता बचुटे यांनी तर २६ जानेवारी रोजी सफाई कामगार यांनी झाडावर चढुन आंदोलन केले त्यावेळी पालकमंत्री धनंजय मुंढे यांच्या समक्ष आ.संदिप क्षीरसागर यांनी महिलेची समजुत काढुन झाडावरून खाली उतरवले.
जिल्हाधिका-यांना पोलीस प्रशासनाची अडचण सोडवता येईना???
शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी दि.२९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी बीड यांना काटेरी तारेचे कुंपण बसविण्यात यावे अशी लेखी विनंती केली होती, त्यानंतर २६ जानेवारीच्या घटनेनंतर दि.२७ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे यांनी कुंपण बसविण्याबाबत लेखी विनंती केली असून आठवडाभरात जिल्हाप्रशासनाने काटेरी तारेचे कुंपण न बसवल्यास सामाजिक कार्यकर्तेच त्यासाठी त्याच कडुनिंबाच्या झाडावर चढुन आंदोलन करतील असा ईशारा प्रशासनाला दिला आहे.








