खा,असोदोद्दीन ओवेसीवरील हल्लयातील आरोपीवर कडक कारवाई करावी--विवेक कुचेकर 

Beed

खा,असोदोद्दीन ओवेसीवरील हल्लयातील आरोपीवर कडक कारवाई करावी--विवेक कुचेकर 

बीड/प्रतिनिधी

उत्तर प्रदेशात एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असोदोद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळया झाडण्यात आल्या या प्रकरणातील दोषीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख विवेक( बाबा) कुचेकर यांनी केली आहे 

उत्तर प्रदेशासह पाच राज्यात निवडणुका सुरू असुन या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे उत्तरप्रदेशातील उमेदवाराच्या प्रचारासाठी एमआयएमचे प्रमुख असोदोद्दीन ओवेसी हे प्रचारासाठी गेले वापस परतत असताना त्यांच्या गाडीवरती अज्ञात माथेफिरूनी गोळीबार केला आहे 

देशात भाजपचे सरकार सत्तेची धुरा हाकीत असताना पुरोगामी विचारसरणीशी निगडीत असलेल्या नेत्यावरती हल्लयाचे प्रमाण वाढले असुन खा,ओवेसी यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा निदंणीय असुन सदरील हल्लयाची चौकशी करून यातील खरा मास्टर माईंड कोण आहे तो पोलीस प्रशासनाने बाहेर काढावा व आरोपीला कठोर शासन करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख विवेक (बाबा )कुचेकर यांनी केली आहे

Sharing

Visitor Counter