क्षीरसागरांच्या गुलामगिरीतुन येथील जनता कधी बाहेर येणार : आ.विनायक मेटे

Beed

क्षीरसागरांच्या गुलामगिरीतुन येथील जनता कधी बाहेर येणार : आ.विनायक मेटे

 आई खाऊ द्यायना अणं बाप भिख मागू द्यायना ' अशी राजुरी सर्कलची अवस्था

राजुरी सर्कल मध्ये ६ कोटी विकास कामांचा शुभारंभ

बीड/प्रतिनिधी

येथील जनता क्षीरसागर यांच्या गुलामगिरीतुन कधी बाहेर येणार असा सवाल आमदार विनायक मेटे यांनी उपस्थित केला. सहा कोटी विकास कामांच्या शुभारंभा प्रसंगी ते बोलत होते.  नवगण राजुरी सर्कल मधील बेलुरा- सोनगाव - पारगांव सिरस या गावातील पावसाळ्यामध्ये पूल नसल्याने रहदारीसाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत होते, या गावातील लोकांनी  या पुलाचे काम करण्यासंदर्भात आ.विनायकराव मेटे  यांना भेटून होत असणारी अडचण लक्षात आणून दिली असता आ.मेटे यांनी सरकारदरबारी याचा पाठपुरावा करून विविध सहा कोटी रुपये कामाचे पूलबांधकामास मंजूरी आणली. यामध्ये बेलुरा गावाशेजारील दोन पूल , सोनगांव नदीवरील एक पूल व सिरस पारगाव नदीवरील एक पूल अशा चार पुलाचे भूमिपूजन आज आ.विनायकराव मेटे यांच्या हस्ते  संपन्न झाले .

      पारगाव सिरस येथे आ.विनायकराव मेटे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी पंचायत समिती सभापती नारायणराव काशीद यांनी केले.सत्कार समारंभास उत्तर देताना आमदार मेटे यांनी क्षीरसागरांवर चौफेर टोलेबाजी केली.ते म्हणाले की,नवगण राजुरी हे दोन्ही क्षीरसागर यांचे मुळगाव आहे, परंतु आज पर्यंत या सर्कल मध्ये सत्ता असतानाही त्यांना विकास करता आला नाही.क्षीरसागरांची गुलामगिरी झटकून टाकूण आता विकासाची कास तरुणांनी धरावी असे आपल्या भाषणात म्हटले . बीड पंचायत समितीचा सभापती दोन दोन महीने पंचायत समिती मध्ये येत नाहीत.एवढा दबाव कुणाचा ? असा प्रश्न उपस्थित करून आ. मेटे यांनी क्षीरसागरांची एवढी लाचारी पत्करू नका असे सुतोवाच केले.पंचायत समितीसाठी अनेक प्रकारे मेहनत घेऊन शेवटी ती क्षीरसागररुपी डाकूंच्या हातात देऊन बबनराव गवते यांनी काय साध्य केले?आज त्यांनाच काही अधिकार राहीले नाहीत .हे त्यांचे दुर्दैव.अशा शब्दात त्यांनी टीका केली.

    पुढे बोलताना ते म्हणाले की,या आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासूनआपले श्रद्धास्थान असणाऱ्या नारायणगडासाठी एक रुपयाचीही  मदत केलेली नाही. परंतु नारायणगडाचा विकासाचा आराखडा पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे आ. मेटे यांनी निक्षून सांगितले. क्षीरसागर यांनी माझ्या विकास कामात कितीही खोडा आणला तरी मी काम करतच राहणार नगद नारायणाच्या आशीर्वादाने मी माझे कर्म करत राहतो आपुलकीचे माणसे जोडत राहतो बाकी त्यांची इमानदारी त्यांच्यापाशी असे सांगून गद्दारांना धडा नक्की मिळेल असेही त्यांनी इशारा दिला. नेकनूर विकास कामाच्या उद्घाटनासाठी आ.संदीप क्षीरसागर किती उतावळे होते हे आपण पाहिलेच आहे, दैनिक पार्श्वभूमीने या रस्त्याच्या कामाबाबत केलेल्या खुलाशाने दुसऱ्याच्या कामाचे उद्घाटन करणारे आजी -माजी आमदार आता तोंड लपून बसलेले आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

      नवगण राजुरी सर्कल मधील महत्वाच्या चारही पुलांचे  भूमिपूजन संपन्न  होत असतानाच तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार लवकरच बंधाऱ्याचे कामासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत असे आश्वासन आ. मेटे यांनी यावेळी दिले. नवगण राजुरी सर्कल मधील बहुतांशी रस्त्यासाठी आपण पाठपुरावा करून कामे पूर्णत्वास नेली आहेत. यापुढेही येथील जनतेच्या अडीअडचणी व विकास कामासाठी आपण सदैव तत्पर आहोत असे त्यांनी भाषणाच्या शेवटी सांगितले.

        अर्थसंकल्प मार्च 2018-19 या अर्थसंकल्पीय वर्षांमध्ये   रामा -63 ते बेलुरा -नारायणगड ते कुर्ला प्रजिमा -18 रस्ता प्रजिमा -28 किमी 19/00  मध्ये पुलाचे बांधकाम करणे रामा -222 ते जोडवाडी - धारवंटा -साक्षाळपिंप्री - पारगाव सिरस - खापर पांगरी - बीड एमआयडिसी ते कुर्ला प्रजिमा -18 वर रस्ता प्रजिमा - 30 कि.मी. 4/300 मध्ये पुलाचे बांधकाम करणे.पारगाव सिरस येथील रामा - 222 ते जोडवाडी -धारवंटा साक्षाळपिंप्री -पारगाव सिरस - खापरपांगरी - बीड एमआयडिसी ते कुर्ला प्रजिमा -18 वर रस्ता प्रजिमा -28 कि.मी. 19/00 मध्ये पुलाचे बांधकाम इत्यादीचा सामावेश आहे . यामध्ये बेलुरा येथील दोन पूल 150.00 लक्ष रुपयाचे  तसेच सोनगाव येथील मुख्य रस्त्यावरील पूल100.00 लक्ष व पारगाव शिरस येथील मुख्य पूल 350.00 लक्ष असे एकूण चार पुलाचे सहा कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. या कार्यक्रमास शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,  माजी पंचायत समिती सभापती नारायण  काशीद, पंचायत समिती सदस्य बबनराव माने, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर कोकाटे, सामाजिक न्याय चे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, गुरसाळे महाराज, बळीजिजा  चव्हाण, कंत्राटदार विजयराव लाटे, संजय गव्हाणे,अँड.गणेश मोरे, नवनाथ काशीद,हनुमंत पवार, शिवराम शिरगिरे, शहर उपाध्यक्ष शेषराव तांबे, मुकुंद गोरे,अविनाश मार्कड, राहुल गायकवाड, प्रकाश जाधव, कृष्णा परजणे, राहुल कोळेकर, अशोक भोकरे, कैलास सामसे, महादेव बहिर, विजय सुपेकर, शिवसंग्राम सोशल मीडिया चे जिल्हाध्यक्ष प्रा. पंडित शेंडगे, परमेश्वर तळेकर, युवक शहर अध्यक्ष प्रशांत डोरले, शैलेश सुरवसे शिवाजी सरडे रवींद्र खोडप्रल्हाद गव्हाणेबंडू नवले रणजीत वाघमोडे राधाकिसन गव्हाणे, दत्ता गरड, रामेश्वर नवले अब्दुल भाई ज्ञानेश्वर ठोंबरे अशोक गोरे, बबन खोड, अनिल कथले,बाळू भालेराव व अन्य शिवसंग्राम नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Sharing

Visitor Counter