शहरातील होम क्वारंटाईन लोक रस्त्यावर फिरू लागले " धारुरच्या प्रशासनाने लक्ष घालावे "

शहरातील होम क्वारंटाईन लोक रस्त्यावर फिरू लागले
" धारुरच्या प्रशासनाने लक्ष घालावे "
किल्लेधारुर दी 21(रवि गायसमुद्रे)
धारूर शहरामध्ये अनेक नागरिक बाहेरून आलेले आहेत. बाहेरून आलेल्या सर्वांन होम क्वारंटाईन करण्यात आले असून सदरील नागरीक घरात न बसता रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या प्रकरणाची दखल शहरातील प्रशासनाने घेऊन त्यांना सक्तीच्या सूचना बजावण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे.
धारुर शहरासह ग्रामीण भागात मुंबई, पुणे इतर ठिकाणाहून अनेक नागरिक आलेले आहेत. बाहेरून आलेल्या व्यक्तींनी २८ दिवस होम क्वारंटाईन होयच्या सूचना आहेत. तशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या.मात्र काही नागरीक शासकीय नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. घरात न थांबता ते रस्त्याने फिरत असल्याचे दिसून येऊ लागले आहेत.
बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या व्यक्ती व त्याच्या कुटुंबीयांनी स्वतःला 28 दिवस होम क्वारंटाईन करून घेणे बंधनकारक आहे, याची आमलबजावणी करण्याची जबाबदारी नियुक्त केलेल्या समितीवर सोपविण्यात आली आहे. इतर राज्यातून किंवा जिल्हयातून आलेल्या व्यक्ती सह कुटूंबियांनी 28 दिवस कॉरनटाईन पालन केल्याचे न आढळल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.
असे सांगण्यातआले मात्र नगरसेवक,दक्षता समितिनी सूचना किंवा कारवाही दिसून आले नाही ही समिती फक्त कागदीपत्रिच दिसून येते आहे.
याबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी आणि समितांना सक्तीच्या सूचना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
शहरात आपल्या प्रभागातील नगरसेवक किंवा दक्षता समितिने आपली भूमिका चोखपणे बजवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.








